शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अमृत अभियानांतर्गत १ हजार कोटींची कामे

By admin | Updated: June 25, 2016 01:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारचे ‘अमृत’ अभियान राबवण्याचे ठरवले आहे. शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी या अभियानांतर्गत महापालिका हद्दीत पाणीपुरवठा आणि मलनि:सारणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून एक हजार कोटींची कामे केली जाणार आहेत.
‘अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. भविष्यात एमआयडीसीवर अवलंबून न राहता उल्हास नदीतून थेट पाणी उचलून त्याचे शुद्धीकरण करून जलकुंभाद्वारे त्याचा पुरवठा करण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, या योजनेची अंदाजे किंमत ३९९ कोटी इतकी प्रस्तावित आहे.
२७ गावांव्यतिरिक्त महापालिका हद्दीतही सात नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने नवीन मुख्य जलवाहिन्या टाकणे व शहरातील नवीन विकसित झालेल्या हद्दीत वितरण व्यवस्था उभी करणे, नवीन जलकुंभांचे झोन तयार करून अस्तित्वात असलेल्या झोनमध्ये बदल करणे व समप्रमाणात वाटप करण्यासाठी अंदाजे १२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिका हद्दीतील झपाट्याने विकसित होत असलेल्या कल्याण परिसरातील उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळिवली, गंधारे, कचोरे, लोकग्राम तर डोंबिवली विभागातील चोळे, कोपर, मोठागाव, ठाकूरवाडी व टिटवाळा विभागातील पश्चिम व पूर्वमध्ये मलनि:सारण व्यवस्थेसाठी १३४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अस्तित्वातील मलनि:सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कल्याणमधील १६ दशलक्ष लीटर, तर डोंबिवलीतील १४ दशलक्ष लीटर क्षमतेच्या मलप्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. शहाड ते टिटवाळा दरम्यान मोहने, मोहिली, बल्याणी, टिटवाळा आदी भागांत मलनि:सारण व्यवस्था व प्रकल्पाच्या कामासाठी १४२ कोटींचा अहवाल तयार केला.