शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सापगावातील १० जणांचा लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 07:20 IST

शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत १० जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाचे संकट सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील सापगाव येथील १० ग्रामस्थांचा २० दिवसांत लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मनीष रेघे यांनीही हे मृत्यू लेप्टोस्पायरोसीसनेच झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत १० जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांची आरोग्यतपासणी सुरू केली आहे. त्यात डेंग्यूच्या तुलनेत लेप्टोस्पायरोसीस या आजाराची लक्षणे जास्त आढळून आली आहेत. तेथे त्वरित आरोग्य शिबिर सुरू करून ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसीसचे उपचार सुरू केल्याचे डाॅ. रेघे यांनी लोकमतला सांगितले.

या २० दिवसांच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. ग्रामस्थांना विविध साथीच्या आजारांनी ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरू करण्याची मागणी लावून धरली. त्यास अनुसरून आता या गावात आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपसभापती जगन पष्टे, गटविकास अधिकारी अशोक भवारी, शहापूर आरोग्य अधिकारी तरुलता धानके, ज्येष्ठ नेते किशनशेठ भांडे, काशिनाथ तिवरे, विलास गगे, निलेश भांडे, विनायक सापळे, मनोज धानके आदी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य