शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम तलावात १,९९४ गणेश मूर्तींचे विसर्जन

By admin | Updated: September 8, 2016 02:23 IST

पर्यावरण संवर्धनाकरिता गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करा, या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला

कल्याण : पर्यावरण संवर्धनाकरिता गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करा, या कल्याण-डोंबिवली महापालिकेने केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून मंगळवारी दीड दिवसाच्या १ हजार ९९४ गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने डोंबिवलीत ७, तर कल्याणमध्ये ३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील विसर्जन घाटांवरील गर्दी कमी व्हावी आणि पर्यावरणाभिमुख संकल्प राबवण्याच्या उद्देशाने हे तलाव तयार करण्यात आले आहेत.महापौर राजेंद्र देवळेकर यांनी गणेशभक्तांना कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, मंगळवारी दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी महापौर देवळेकर, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्थानकाजवळील कृत्रिम तलावाला भेट देऊन तेथील विसर्जनव्यवस्थेची पाहणी केली. या वेळी त्यांनी विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला असता भक्तांच्या सोयीसाठी टेबलांची संख्या वाढवणे, निर्माल्यासाठी आणखी कर्मचारी नियुक्त करणे, अशा प्रकारच्या सूचना नागरिकांनी केल्या. यावर, महापौरांनी प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांना सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)