शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यूएस ओपन टेनिस; रोहन बोपन्नाचा पराभव, मिश्र दुहेरीत निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 05:57 IST

US Open Tennis 2024: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याला इंडोनेशियाच्या अल्दिया सुत्जियादी हिच्यासोबत मिश्र दुहेरीत खेळताना यूएस ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. 

न्यूयॉर्क - भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना याला इंडोनेशियाच्या अल्दिया सुत्जियादी हिच्यासोबत मिश्र दुहेरीत खेळताना यूएस ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.

डोनाल्ड यंग-टेलर टाउनसेंड या अमेरिकन जोडीने बोपन्ना-अल्दिया यांना ६-३, ६-४ असे नमवले. याआधी, बोपन्ना पुरुष दुहेरीतही पराभूत झाला होता. त्याच्या पराभवानंतर भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.

सबालेंकाची उपांत्य फेरीत धडकमहिला एकेरीत बेलारुसच्या आर्यना सबालेंकाने उपांत्य फेरीत धडक मारताना चीनच्या झेंग क्विनवेन हिचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. या सामन्यासाठी माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची उपस्थिती विशेष ठरली. अमेरिकेच्या एम्मा नवारोने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना आपल्याच देशाच्या पाउला बडोसाचा ६-२, ७-५ असा पराभव केला. यासह नवारोने पहिल्यांदाच कोणत्याही ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. 

पुरुषांमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने धक्कादायक निकाल नोंदवताना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याचा ७-६(७-२), ३-६, ६-४, ७-६(७-३) असा पराभव केला. अन्य सामन्यात बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवने दुखापतीमुळे माघार घेतल्याने अमेरिकेच्या फ्रान्सेस टियाफोची उपांत्य फेरीत कूच झाली. दिमित्रोवने माघार घेतली तेव्हा टियाफो ६-३, ६-७(५-७), ६-२, ४-१ असा आघाडीवर होता.

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारत