Tennis Star Eugenie Bouchard inundated with offers after saying ‘quarantine would be more fun with a boyfriend’ svg | Coronavirus: बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!

Coronavirus: बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!

कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा, सीरि ए इटालियन लीग, चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग आदी फुटबॉल स्पर्धांसह एटीपी आणि डब्लूटीपी या टेनिस स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बरेच खेळाडू आयसोलेट झाले आहेत. पण, हा एकांतवास त्यांना काही फार रूचलेला नाही. ब्युटिफुल टेनिसस्टार यूजेनी बुचार्डनं या आयसोलेट ( एकांतवास) वरून एक पोस्ट लिहिली आहे. त्यावरून जगभरातील चाहते सूसाट सुटले आहेत...

संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. त्यामुळे सर्वांना घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. बुचार्डही सध्या आयसोलेट झाली आहे आणि तिची एक पोस्ट केल आहे. २६ वर्षीय टेनिसस्टारनं म्हटली आहे की, ''ही माझी तक्रार नाही, परंतु बॉयफ्रेंड बरोबर आयसोलेट होणं हे अधिक आनंददायी असते.''


७ जूनपर्यंत सर्व ATP आणि WTA स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुचार्ड सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. पण, तिच्या या ट्विटवर चाहते सूसाट सुटले आहेत.  


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!

पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक

Corona Virus : विरुष्काचं लोकांना महत्त्वपूर्ण आवाहन; पाहा व्हिडीओ

Web Title: Tennis Star Eugenie Bouchard inundated with offers after saying ‘quarantine would be more fun with a boyfriend’ svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.