शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open: सबालेंकाने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन, रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 06:06 IST

Australian Open: बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले. यासह सबालेंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. 

मेलबर्न : बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिनाचे कडवे आव्हान परतवले. यासह सबालेंकाने कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडलेल्या सबालेंकाने जबरदस्त पुनरागमन केले. तिने सलग दोन सेट जिंकत रिबाकिनाचे आव्हान ४-६, ६-३, ६-४ असे परतवले. विशेष म्हणजे सबालेंकाने सात डबल फॉल्ट केले, मात्र ५१ विनर्सपैकी १७ एस फटके मारत सबालेंकाने सामन्यावर वर्चस्व मिळवले. यंदाचे वर्ष सबालेंकासाठी जबरदस्त ठरले असून तिने सलग ११ सामने जिंकले आहेत. यादरम्यान तिने दोन जेतेपदही पटकावली आहेत. रिबाकिनाने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत अव्वल मानांकित इगा स्वियातेकला नमवून खळबळ माजवली होती. त्यामुळे तिला अंतिम सामन्यात संभाव्य विजेती मानले जात होते. मात्र, तिला पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतरही सबालेंकाचा धडाका रोखता आला नाही. आता दुसरे स्थानयाआधी सबालेंकाने तीन ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, यावेळी तिने सर्व कसर भरून काढताना पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. या शानदार विजेतेपदासह सबालेंका आता जागतिक क्रमवरीत दुसऱ्या स्थानीही झेप घेईल.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन