शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open 2026: लढवय्या जोकोविच! सिन्नरचं 'चक्रव्यूव्ह' भेदलं! आता फायनलमध्ये अल्काराझशी गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 20:08 IST

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिन्नरने पहिला सेट ६-३ जिंकत दमदार सुरुवात केली. पण..

ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सर्बियन दिग्गज टेनिस स्टार नोवाक जोकोविचने  इटालियन यानिक सिन्नर विरुद्धच्या थरारक आणि रंगतदार सामन्यात पराभूत केले आहे. या विजयासह जोकोनं कारकिर्दीतील ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक मारली आहे. दहावेळचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता असलेल्या जोकोविचने दोनदा सेटमध्ये पिछाडीवर पडूनही दमदार पुनरागमन करत गत विजेत्या सिन्नरला ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले.  आता फायनलमध्ये जोकोविचची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अल्काराझशी पडणार आहे. त्याने पहिल्या सेमीफायनलमध्ये दुखापतीशी झुंज देत अलेक्झांडर झ्वेरेव्हवर पाच सेट्सच्या थरारक लढतीत विजय मिळवला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

लढवय्या जोकोविच! सिन्नरविरुद्धच्या पराभवाची मालिका केली खंडीत

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिन्नरन पहिला आणि तिसरा सेट जिंकत सामना आपल्या बाजूने वळवला होता. मात्र चौथ्या क्रमांकावरील जोकोविचने अनुभव, संयम आणि जिद्द दाखवत पुन्हा पुन्हा कमबॅक केले. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळानंतर सिनरविरुद्ध मिळवलेला हा जोकोविचचा पहिला विजय ठरला.

Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा

दोघांच्यातील लढत एकदम जबरदस्त झाली, शेवटी जोकोनं बाजी मारली

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिन्नरने पहिला सेट ६-३ जिंकत दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं स्कोअर लाइन उलटी फिरवली. हा सेट ६-३ असा आपल्या नावे करत दिग्गज सर्बियन टेनिसपटूनं परफेक्ट रिप्लाय देत सामन्यात बरोबरीचा डाव साधला. तिसऱ्या सेटमध्ये इटालियन टेनिसपटूनं पुन्हा धमक दाखवली अन्  ६-४ अशी बाजी मारली. जोकोविचनं यावेळीही पुन्हा पटलवार करत सेम टू सेम रिप्लाय देत ६-४ असा सेट आपल्या नावे करत सामना पाचव्या सेटमध्ये नेला. या सेटमध्येही दोघांच्या रंगतदार खेळ पाहायला मिळाला. अखेर जोकोविचनं हा सेट ६-४ असा जिंकत फायनलमध्ये एन्ट्री मारली.

२०२३ च्या विम्बल्डन स्पर्धेतनंतर जोकोला मिळालं यश 

मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून जोकोविच हा सिन्नर विरुद्ध विजय मिळवण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळाले होते. २०२३ च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जोकोनं सिनरला ६-३, ६-४, ७-६(४) अशी मात दिली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी इटालियन युवा टेनिस स्टार अनुभवी जोकोला चॅलेंज देताना दिसले. २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सेमीत सिन्नरनं ६-१, ६-२, ६-७(६), ६-३ अशा फरकाने जोकोविचला पराभवाचा दणका दिला. गत कॅलेंडर ईयरमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येही या दोघांच्या सामना रंगल्याचे पाहायला मिळाले इथंही  सिन्नरनं ६-४, ७-५, ७-६(३) अशी बाजी मारली होती. पण अखेर त्याचे चक्रव्यूव्ह भेदत जोकोविचनं फायनलच तिकी मिळवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Djokovic battles past Sinner, sets up Alcaraz final at Australian Open.

Web Summary : Novak Djokovic defeated Jannik Sinner in a five-set Australian Open semi-final, securing a spot against Alcaraz in the final after a hard fought victory.
टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन