शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यातील तंत्रज्ञान! झोमॅटोच्या मालकाच्या चेहऱ्यावर हे कोणते गॅजेट?  नेटकरी झालेत अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:56 IST

Zomato Deepinder Goyal Gadget

नवी दिल्ली: झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल हे नेहमीच त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर (कानफटीवर) एक छोटे पांढरे गोल गॅजेट दिसले आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. हे केवळ फॅशनसाठी लावलेले स्टिकर नसून, मेंदूचे सिग्नल वाचणारे एक अत्याधुनिक 'ब्रेन-मॉनिटरिंग डिव्हाइस' आहे.

काय आहे हे 'डोक्याबाहेरचे' मशीन?सामान्य भाषेत सांगायचे तर, हे मेंदूचे सिग्नल वाचणारे एक सेन्सर आहे. आपला मेंदू दर सेकंदाला काही इलेक्ट्रिकल सिग्नल तयार करत असतो. हे डिव्हाइस कोणत्याही इंजेक्शन किंवा शस्त्रक्रियेशिवाय केवळ त्वचेवर चिकटवले जाते आणि बाहेरूनच मेंदूच्या लहरी टॅप करते. हे तंत्रज्ञान पूर्णपणे 'नॉन-इनवेसिव्ह' आहे, म्हणजेच यामुळे मेंदूला कोणतीही इजा होत नाही.

किंमत आणि मुख्य वैशिष्ट्येया गॅजेटची किंमत बाजारात ७०,००० ते १,००,००० रुपयांपर्यंत असू शकते. याच्या माध्यमातून खालील गोष्टींचे मोजमाप केले जाते:

एकाग्रता (Focus): कामात तुम्ही किती लक्ष केंद्रित करत आहात.

तणाव पातळी (Stress Level): तुमचा मेंदू सध्या किती दबावाखाली आहे.

झोप आणि ध्यान (Meditation): तुमच्या झोपेची गुणवत्ता आणि ध्यानादरम्यान मेंदूची स्थिती.

पॅरालाइज्ड रुग्णांसाठी वरदान?या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा भविष्यात आरोग्य क्षेत्रात होणार आहे. हे डिव्हाइस मेंदूचे सिग्नल मशीनला पाठवते. यामुळे पॅरालाइज्ड (अर्धांगवायू झालेल्या) व्यक्तींना न बोलता किंवा हात न हलवता केवळ विचारांच्या जोरावर स्क्रीन, गेम किंवा कोणतेही उपकरण नियंत्रित करता येईल. हे तंत्रज्ञान 'ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस' च्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.

धोका आणि प्रायव्हसीतज्ज्ञांच्या मते, हे डिव्हाइस मेंदूला कोणतेही सिग्नल पाठवत नाही, तर फक्त वाचते; त्यामुळे ते सुरक्षित मानले जाते. मात्र, 'डेटा प्रायव्हसी' हा मोठा प्रश्न आहे. जर तुमच्या विचारांचा आणि मेंदूचा डेटा चुकीच्या हातात गेला, तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Zomato CEO's brain-monitoring gadget sparks curiosity about future tech.

Web Summary : Zomato's CEO Deepinder Goyal's brain-monitoring device spotted in a podcast sparked interest. The non-invasive gadget measures focus, stress, sleep quality, aiding paralyzed patients using brain-computer interface. Data privacy concerns exist.
टॅग्स :ZomatoझोमॅटोHealthआरोग्य