...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:35 IST2025-06-21T11:34:03+5:302025-06-21T11:35:53+5:30

Cyber Crime: जगातील ३० डेटाबेसमधून १६ अब्ज खात्यांचे पासवर्ड हॅकर्सनी चोरले; फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल इत्यादी सेवांचा समावेश; कोट्यवधी युझर्सचा खासगी डेटा लीक होण्याची भीती वाढली

Your account may be hacked; Fears that the private information of crores of people has been leaked | ...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील ३० डेटाबेसमधून सुमारे १६ अब्ज लॉगइन क्रेडेन्शिअल्सची चोरी झाले आहे. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, जीमेल, ॲपल आणि असंख्य अन्य सेवांचा समावेश आहे. ‘सायबर न्यूज’च्या संशोधकांनी ही चोरी शोधून काढली. जानेवारी २०२५ पासून ते यावर काम करीत होते. ही सर्वांत मोठी पासवर्ड्स चोरी असण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी युझर्सचा डेटा लीक होण्याची भीती आहे. यामुळे डेटा चोरी, फिशिंग स्कॅम व खाते हॅक अशा संकटांचा सामना करावा लागू शकतो.

तुम्ही काय कराल?
- तुम्ही तुमचा पासवर्ड तत्काळ बदला
- तुमच्या खात्यांसाठी टू फॅक्टर ऑथिंटीकेशन चालू करा 
- सोपे पासवर्ड बदला.

चोरलेला डेटा अतिशय नवा
चोरलेला डेटा अतिशय नवीन असून, याला इन्फोस्टिलर्स मालवेअरच्या माध्यमातून गोळा करण्यात आले आहे.  हा मालवेअर लोकांचा डेटा त्यांना न कळता चोरतो. 
चोरीच्या या डेटामध्ये युझरनेम आणि पासवर्ड आहेत. मालवेअर युझर्सच्या फोनमधून हे डेटा चोरत आहेत. हॅकर्स याचा वापर थेट वापर करतात किंवा डार्क वेबवर विकून टाकतात. ५५ अब्ज लोकांकडे इंटरनेट उपलब्धता आहे. याचाच अर्थ एकाच व्यक्तीच्या अनेक खात्यांचा ओळख डेटा चोरला गेलेला आहे. त्यामुळे पासवर्ड बदलणे गरजेचे आहे.

कोणते पासवर्ड चोरले?
डेटाबेसकडे इंटरनेट सेवांच्या खात्यांचे लॉगइन नावे व पासवर्ड्स असतात. यात फेसबुक व इन्स्टाग्राम अशी समाज माध्यमे, जी-मेलसारखी ईमेल सेवादाते, गिटहबसारखे विकासक मंच, टेलिग्राम, व्हीपीएसारखे संदेश ॲप आणि सरकारी पोर्टल्स यांचा समावेश आहे. यातील यूआरएल, युजर नेम आणि पासवर्ड. त्याची चोरी हॅकर्सनी केली आहे.

गुन्ह्यांसाठी चोरलेल्या डेटाचा वापर 
चोरलेल्या डेटाचा वापर ऑनलाईन गुन्हेगारीसाठी केला जाऊ शकतो. खाती ताब्यात घेणे, ओळख चोरणे आणि घातक स्वरूपाची फसवणूक मोहीम राबविणे यासाठी हा डेटा वापरला जाऊ शकतो. 

Web Title: Your account may be hacked; Fears that the private information of crores of people has been leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.