शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 09:36 IST

स्मार्टफोन युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कारण नविन वर्षाच्या निमित्ताने युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

ठळक मुद्देनववर्षाच्या निमित्ताने युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'New Year Virus' असा एक नवा व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असून अनेक स्मार्टफोनला त्याने लक्ष्य केले.लिंकवर क्लिक करताच स्मार्टफोन किंवा संगणक हॅक होण्याची शक्यताही अधिक असते.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजनी धुमाकूळ घातला होता. सरत्या वर्षाला आनंदात निरोप देत मोठ्या दणक्यात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र स्मार्टफोन युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कारण नविन वर्षाच्या निमित्ताने युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Whatsapp  वर  'New Year Virus' असा एक नवा व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असून अनेक स्मार्टफोनला त्याने लक्ष्य केले आहे. युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये एखाद्या वेबपेजची लिंक दिली जाते. हॅकर्स या लिंकवर क्लिक करण्यासाठी युजर्सना काही आकर्षक ऑफर्स देत असतात. मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करताच स्मार्टफोन किंवा संगणक हॅक होण्याची शक्यताही अधिक असते. याशिवाय हे व्हायरसचे मेसेज अनेक जाहिरातींद्वारेही पाठवले जातात. तसेच यामध्ये काही खोट्या सेवांना सबस्क्राइब करण्यास सांगितले जाते.

Whatsapp  वर आलेला 'New Year Virus' हा एक नवा व्हायरस एक धोकादायक व्हायरस असून युजर्सना नुकसान पोहचवू शकतो. अशा मेसेजवर क्लिक न करणं हा या व्हायरसपासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे. तसेच मेसेज करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करावं. सातत्याने हॅकर्स फेक मेसेज हे पाठवून युजर्सना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अशा मेसेजपासून सावध राहा. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. 

नववर्षात व्हॉट्सअ‍ॅपने रेकॉर्ड केला आहे. फक्त 24 तासांत 100 अब्ज मेसेज करण्यात आले आहेत. वाढदिवस, सण आणि इतर अनेक कारणांसाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन वर्षाच्या निमित्ताने असाच उत्साह पाहायला मिळाला. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजचा महापूरच आला. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे तब्बल 100 अब्ज मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील 20 अब्ज मेसेज हे फक्त भारतीयांनी पाठवले आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. कॉल वेटिंग हे नवं फीचर देण्यात आलं असून यामध्ये कॉलच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करता येणार आहे. कंपनीने आयओएस व्हर्जनसाठी हे खास फीचर रोलआऊट केले आहे. तसेच अपडेटमध्ये चॅट स्क्रीनही अधिक चांगली देण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ऑडिओ कॉल दरम्यान वेटिंग कॉल उचलू शकतात. कॉलिंगला महत्त्व देणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा फायदेशीर असणार आहे. या फीचरच्या मदतीने वेटिंग कॉल कट करण्याची तसेच सुरू असलेला कॉल थांबवून नवा कॉल रिसीव्ह करता येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

व्हॉट्स अ‍ॅपचे मॅसेज डिलीट झालेत? चिंता नको; ही ट्रीक वापरा आणि परत मिळवा...

Whatsapp वर नववर्षाचं दमदार स्वागत, 24 तासांत 100 अब्ज मेसेज

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

काय सांगता? इंटरनेटशिवाय आता शेअर करता येणार फोटो, व्हिडीओ

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान