चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 03:14 PM2020-01-06T15:14:40+5:302020-01-06T15:31:32+5:30

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो.

New battery can power phone for five days | चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

Next
ठळक मुद्देतंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे. नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे.स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर हा केला जातो. मात्र अनेकदा सतत फोन सुरू असल्याने फोनची बॅटरी लवकर लो होते. नेमका कामाच्या वेळेस फोन चार्ज करता न आल्याने बंद होतो आणि विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच स्मार्टफोन युजर्ससाठी एक खूशखबर आहे. त्यांना आता चार्जिंगचं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण बॅटरीबाबत एक नवीन तंत्रज्ञान हे विकसित करण्यात आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्टफोनची बॅटरी ही सतत पाच दिवस चालणार आहे.

नवीन बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रेडीशनल लिथियम-आयर्न कॉम्बिनेशच्या जागी नवीन कॉम्बिनेशन युजर्सना मिळणार आहे. आतापर्यंत लिथियम-आयर्न बॅटरी या स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि पेसमेकरला पॉवर देण्यासाठी वापरल्या जातात. मात्र या जागी रिसर्चर्सनी अल्ट्रा-हाय कॅपिसिटीसाठी लिथियम सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे. स्मार्टफोनप्रमाणे बॅटरीसाठी विकसित केलेले हे नवे तंत्रज्ञान इलेक्ट्रीक कारसाठी देखील वापरण्यात येणार आहे. कार एकदा चार्ज केल्यानंतर 1000 किलोमीटरपेक्षा अधिक चालवता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी दिलेल्या माहितीनुसार, रिसर्चर्सच्या एका टीमने सल्फर कॅथॉड्सच्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करून यशस्वीरित्या ते सध्या असलेल्या बॅटरी कॉम्बिनेशनच्या जागी वापरले आहे. बॅटरी तंत्रज्ञानाची चाचणी ही या वर्षी कार आणि ग्रिड्समध्ये केली जाणार असल्याची माहिती टीममधील एका सदस्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अँड्रॉईड फोनमध्ये स्क्रीन, डाटा, जीपीएस या तीन गोष्टींवर सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होते. त्यामुळे काही सेटींग्ज बदलल्यावर बॅटरीलाईफमध्ये बर्‍यापैकी फरक जाणवतो.

Phone battery decides the mood of the user; An increase in stress if 50 percent | मोबाईलची बॅटरी ठरवतेय वापरणाऱ्याचा मूड; 50 टक्के झाल्यास तणावात वाढ

मोबाईल स्क्रीन 

टचस्क्रीन हे स्मार्टफोनचे अविभाज्य अंग आहे.  बटणांचा कीपॅड असलेले फोन आता फारसे बनतच नाहीत. या स्क्रीनच्या टचसाठी आणि स्क्रिन ब्राईटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी जाते. यावर ब्राईटनेस सेटींग ऑटो मोडवर ठेवली की फोनची बॅटरी जास्त वापरली जाते. त्यापेक्षा मिनीममच्या जवळ पण आपल्या डोळ्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा लेव्हलवर मॅन्युअली फोन  ठेवायचा. जेव्हा आपण अधिक प्रकाशात जातो तेव्हा तो गरज भासल्यास वाढवायचा. थोडं काम वाढेल पण एक्स्ट्रा ब्राईटनेसमुळे जाणारी बॅटरी वाचते.

डाटा

डाटा तर फार महत्त्वाचा. नाही तर फोनचा वापर फक्त बोलण्यापुरता मर्यादित होतो. मात्र आपण कनेक्टेड असतो तेव्हा डाटा देवाणघेवाणीसाठी बॅटरी जातेच. आपण कमी कव्हरेज किंवा कव्हरेज नसलेल्या भागात असतो तेव्हा नेटवर्क शोधण्यासाठीतर जरा जास्तच बॅटरी जाते. त्यामुळे अगदीच गरज नसते तेव्हा मोबाईल नेटवर्क बंद करून टाका. बॅटरी वाचेल.

जीपीएस 

आपल्याला कळतही नाही पण हल्ली जीपीएस सतत ऑन असतं. मात्र सतत ते ऑन असण्याची काहीच गरज नाही. प्रवासात मॅप आणि नेविगेशन वापरतानाच फक्त जीपीएस सुरू केलेलं सर्वात चांगलं. एरव्ही ते बंद ठेवायचं, बॅटरी बचत होते.

 

Web Title: New battery can power phone for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.