शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

'हे' १० अंकी मोबाईल नंबर होणार बंद! Trai ने दिला आदेश, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 14:09 IST

ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

काही दिवसापासून अनेकांना मार्केट कंपन्यांचे फोन येत आहेत. यामुळे अनेकांनी ट्रायकडे या संदर्भात तक्रारी केल्या आहेत, आता यावर ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  टेलीमार्केटिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने नवा नियम जारी केला आहे. त्यानुसार १० अंकी नोंदणी नसलेले मोबाईल क्रमांक येत्या ५ दिवसात बंद होतील. अनोंदणीकृत मोबाईल नंबरवरून कॉल करण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील ५ दिवसांत, १० अंकी प्रचारात्मक संदेश, जे प्रमोशनल कॉलिंगसाठी वापरले जातात, ते बंद केले जाणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे मार्केटिंगचे येणार कॉल बंद होणार आहेत. 

ट्रायने वापरकर्त्यांना त्रासदायक प्रमोशनल मेसेज आणि कॉल करण्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. '१० अंकी मोबाईल प्रमोशनसाठी वापरता येणार नाही. सामान्य कॉल्स आणि प्रमोशनल कॉल्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे नंबर जारी केले जातात. यामुळे सामान्य कॉल आणि जाहीरातीसाठी केलेले कॉल ओळखले जातात. काही टेलिकॉम कंपन्या नियमांच्या विरोधात १० अंकी मोबाइल नंबरवरून प्रचारात्मक संदेश आणि कॉल करत आहेत, असं एका अहवालात म्हटले आहे. ट्रायच्या नव्या आदेशानुसार, सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांना ५ दिवसांत नियम लागू करावे लागतील. यानंतर, नियमांचे उल्लंघन केलेले दिसल्यास जाहीरातीसाठी कॉल करणारा १० अंकी क्रमांक ५ दिवसांच्या आत बंद केला जाईल.

'टेक'मत: मोबाइलमध्ये हे ॲप ठेवा, पश्चात्तापाची वेळच येणार नाही

जर तुम्ही प्रमोशनल कॉलिंगसाठी १० अंकी मोबाइल नंबर वापरत असाल, तर असे करणे नियमांचे उल्लंघन आहे, आता इतून पुढे हे नंबर वापरता येणार नाहीत. अन्यथा पुढील ५ दिवसांत तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक केला जाईल. टेलीमार्केटिंग कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वापरकर्त्यांनी वैयक्तिक मोबाइल नंबरवरून कॉल करू नयेत, असा सल्ला दिला जातो. त्याऐवजी, वापरकर्त्यांनी कंपनीच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून जाहीरातीसाठी कॉलिंग करावे. १० अंकी नंबर विना नोंदणीकृत वापरल्यास तो पुढील ५ दिवस बंद केली जाणार आहे. 

वापरकर्त्यांनी गेल्या काही दिवसापासून या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. आता ट्राय या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बँक, तसेच मार्केटमधील काही प्रोडक्ट मार्केटींगसाठी या कॉलचा वापर करत आहेत. वापरकर्त्यांना कधीही फोन करुन डिस्टर्ब केले जात आहे. यावर आता हा मोठा निर्णय ट्रायने घेतला आहे.  

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइल