'टेक'मत: मोबाइलमध्ये हे ॲप ठेवा, पश्चात्तापाची वेळच येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 09:46 AM2023-03-12T09:46:57+5:302023-03-12T09:48:23+5:30

यासोबतच, तुम्ही तो फोन लॉक करू शकता आणि पासवर्डही बदलू शकता.

keep find my device app in your mobile there will be no time to regret | 'टेक'मत: मोबाइलमध्ये हे ॲप ठेवा, पश्चात्तापाची वेळच येणार नाही

'टेक'मत: मोबाइलमध्ये हे ॲप ठेवा, पश्चात्तापाची वेळच येणार नाही

googlenewsNext

गुगलने डेटा आणि वैयक्तिक सुरक्षा लक्षात घेऊन ‘फाइंड माय डिव्हाइस’ (Find My Device) नावाचे ॲप आणले आहे. हे ॲप फोनमध्ये असल्यास फोन हरवल्यावरही तुमच्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. याच्या मदतीने तुम्ही चोरीला गेलेल्या आणि हरवलेल्या फोनचे लोकेशन अगदी सहज मिळवू शकता. एवढेच नाही तर याद्वारे तुम्ही चोरीला गेलेल्या फोनमधील वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडीओ इत्यादी सुरक्षितपणे डिलीट करू शकता. यासोबतच, तुम्ही तो फोन लॉक करू शकता आणि पासवर्डही बदलू शकता.

कसे काम करते?

सर्वप्रथम तुम्हाला फोनमध्ये ‘फाइंड माय डिव्हाइस’ ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर, लॉग-इन करा आणि ईमेलद्वारे तुमचे प्रोफाइल सक्रिय ठेवा. फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास इतर कोणत्याही फोन, लॅपटॉपच्या मदतीने ‘फाइंड माय डिव्हाइस’वर तुमच्या फोनवाल्या ईमेल आयडीने लॉग-इन करून फोन कुठे आहे याचे लोकेशन बघू शकता. तसेच, ‘प्ले साउंड’ हा पर्याय वापरून चोरलेला फोन सायलेंटवर ठेवला असला तरी ५ मिनिटांपर्यंत तुम्ही त्यावर रिंग वाजवू शकता.

‘सिक्युअर डिव्हाइस’ या पर्यायाद्वारे तुम्ही हरवलेला फोन लॉक तर करू शकताच, सोबतच लॉक स्क्रीनवर मेसेज किंवा फोन नंबरही दर्शवू शकता. तर, ‘इरेज डिव्हाइस’ पर्यायाद्वारे फोनमधील फोटो-व्हिडीओ किंवा अन्य महत्त्वाची सामग्री डिलिट करण्याचा पर्यायही मिळतो. या सुविधांसाठी तुमच्या चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनवर इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: keep find my device app in your mobile there will be no time to regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.