टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:54 IST2026-03-04T17:53:39+5:302026-03-04T17:54:55+5:30

Tecno Pop X Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने त्यांचा नवा स्मार्टफोन टेक्नो पॉप एक्स भारतात लॉन्च केला आहे.

Tecno Pop X Launched Under 9000 in India, Know Features and Specifications | टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन

टेक्नोचा धमाका! बजेट ग्राहकांसाठी अवघ्या ८४९९ रुपयांत लॉन्च केला तगडा स्मार्टफोन

स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने त्यांचा नवा स्मार्टफोन टेक्नो पॉप एक्स भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन या आठवड्यात भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये इतकी आहे. त्यामुळे कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.

टेक्नो पॉप एक्सची किंमत भारतात ८ हजार ४९९ आहे आणि तो ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन चिली ग्रीन आणि फ्लेअर व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ६ मार्चपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि इतर रिटेल चॅनेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असेल. एचडीएफसी बँक कार्डच्या वापरकर्त्यांना या फोनच्या खरेदीवर विशेष सूट मिळणार आहे.

या फोनमध्ये ६.७५-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. यात ग्राहकांना १३ मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. टेकनो पॉप एक्समध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ५००० एमएएच बॅटरी आहे.  टेक्नो पॉप एक्सला आयपी ६४ रेटिंगसह येतो. हा फोन ड्युअल-सिम हँडसेट आहे जो अँड्रॉइड १५ वर चालतो.

Web Title : टेक्नो पॉप एक्स भारत में सिर्फ ₹8499 में लॉन्च हुआ

Web Summary : टेक्नो ने भारत में पॉप एक्स स्मार्टफोन ₹8499 में लॉन्च किया। इसमें 4GB RAM, 64GB स्टोरेज, 6.75 इंच HD+ डिस्प्ले, 13MP कैमरा और 5000mAh बैटरी है। 6 मार्च से उपलब्ध, HDFC कार्डधारकों को विशेष छूट मिलेगी।

Web Title : Techno Pop X Launched in India at Just ₹8499

Web Summary : Techno launched the Pop X smartphone in India for ₹8499. It features 4GB RAM, 64GB storage, a 6.75-inch HD+ display, 13MP camera, and 5000mAh battery. Available from March 6th, HDFC cardholders get special discounts.