शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:22 IST

परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला.

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला. त्याची बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांमुळे प्रभावित झालेल्या परप्लेक्सिटी या एआय कंपनीने लगेचच त्याला तब्बल १ कोटी ६ लाखांचे वार्षिक पॅकेज ऑफर केले आणि त्याच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. 

वसईच्या विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील जितेंद्र प्रजापती या विद्यार्थ्याला परप्लेक्सिटी एआय कंपनीने गलेलठ्ठ पगाराची नोकरी देत त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदासाठी निवड केली आहे. अशा प्रकारे निवड झालेला जितेंद्र हा पालघर जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. जितेंद्र प्रजापती (२१) हा भाईंदरमध्ये राहतो. तो वसईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सध्या तो संगणक शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. 

अभियांत्रिकीतील निपुणतेची पावतीमहाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या जितेंद्रची कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी निवड झाली आहे. जितेंद्रची झालेली निवड ही संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीतून मिळणारे हे दरवर्षीचे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज म्हणजे जितेंद्र यांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्याच्या निपुणतेची पावती आहे, असे कॉलेजच्या प्राचार्य डॉ. राकेश हिमते यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar student solves AI glitch, lands ₹1 crore job.

Web Summary : Jitendra Prajapati from Palghar solved Perplexity AI's technical glitch. The company offered him a software engineer position with a ₹1.06 crore annual package. He is a student at Vidya Vardhini College, Vasai.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स