टाटाने नवी एआय टेक्नॉलॉजी शोधली! साडीवर तुम्हाला हवी ती डिझाईन, १० दिवसांचे काम ६ दिवसात उरकणार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:33 IST2026-02-18T11:32:03+5:302026-02-18T11:33:56+5:30

Tata Ai Saree Designer Technology: टाटाच्या AI 'डिजिटल लूम' मुळे साडी विणकाम क्षेत्रात क्रांती. आता ग्राहक स्वतः साडी डिझाइन करू शकणार. उत्पादनाचा वेळ ४० टक्क्यांनी घटला. सविस्तर वाचा.

Tata Ai Saree Designer Technology: Tata has invented a new AI technology! The design you want on a saree, 10 days' work will be completed in 6 days.. | टाटाने नवी एआय टेक्नॉलॉजी शोधली! साडीवर तुम्हाला हवी ती डिझाईन, १० दिवसांचे काम ६ दिवसात उरकणार..

टाटाने नवी एआय टेक्नॉलॉजी शोधली! साडीवर तुम्हाला हवी ती डिझाईन, १० दिवसांचे काम ६ दिवसात उरकणार..

भारतीय वस्त्रोद्योगात, विशेषतः साडी विणकामाच्या पारंपरिक क्षेत्रात आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची एन्ट्री झाली आहे. 'टाटा'ने विकसित केलेल्या एआय आधारित 'डिजिटल लूम' तंत्रज्ञानामुळे विणकाम क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता विणकरांचा वेळ तर वाचणारच आहे, पण ग्राहकांनाही आपल्या आवडीनुसार साडी कस्टमाइज करण्याची संधी मिळणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कांचीपुरमच्या विणकरांनी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. विणकाम करताना रिअल-टाइम मार्गदर्शन देणारे हे तंत्रज्ञान विणकराकडून होणाऱ्या चुका त्वरित दुरुस्त करण्यास मदत करते. पूर्वी एखादी छोटी चूक सुधारण्यासाठी २० मिनिटे लागायची, आता ती चूक होण्याआधीच एआय इशारा देते.

ठळक वैशिष्ट्ये

कस्टमायझेशन: एका खास ॲपच्या मदतीने ग्राहक स्वतःचा रंग, डिझाइन आणि पॅटर्न निवडू शकतात.

३डी प्रिव्ह्यू: साडी प्रत्यक्ष विणण्यापूर्वी ती कशी दिसेल, याचा ३डी प्रिव्ह्यू पाहण्याची सोय यात आहे.

वेळेची बचत: पूर्वी ज्या साडीला १० दिवस लागायचे, ती आता केवळ ६ दिवसांत तयार होत आहे. उत्पादन वेळेत ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

उत्पन्नात वाढ: कमी वेळात जास्त साड्या तयार होत असल्याने विणकरांच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता आहे.

हे तंत्रज्ञान पारंपरिक भारतीय विणकाम शैलीला धक्का न लावता तिला अधिक अचूक आणि वेगवान बनवत आहे. टाटांच्या या उपक्रमामुळे भारतीय हस्तकला जागतिक पातळीवर एका वेगळ्या उंचीवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.

Web Title : टाटा की एआई तकनीक से साड़ी डिजाइन में क्रांति, उत्पादन समय में कटौती।

Web Summary : टाटा के एआई-संचालित डिजिटल लूम ने साड़ी बुनाई में क्रांति ला दी है, जिससे अनुकूलन संभव है और उत्पादन समय में 40% की कमी आई है। कांचीपुरम के बुनकर पहले से ही वास्तविक समय में त्रुटि सुधार से लाभान्वित हो रहे हैं, जिससे दक्षता और संभावित आय बढ़ रही है।

Web Title : Tata's AI tech revolutionizes saree design, cuts production time.

Web Summary : Tata's AI-powered digital loom transforms saree weaving, enabling customization and reducing production time by 40%. Weavers in Kanchipuram are already benefiting from real-time error correction, boosting efficiency and potential income.