आश्चर्यच...! १० वर्षांच्या मुलानं ३०० रुपयांना विकत घेतली वेबसाइट, ६०० कोटींना विकली; काय होतं खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 21:55 IST2026-02-13T21:54:49+5:302026-02-13T21:55:28+5:30
a 10 year old bought ai com for 300 rupees decades later it sold for 70 million dollars in crypto

आश्चर्यच...! १० वर्षांच्या मुलानं ३०० रुपयांना विकत घेतली वेबसाइट, ६०० कोटींना विकली; काय होतं खास?
जगभरात इंटरनेटचा फारसा प्रसार झालेला नव्हता, तेव्हा १० वर्षांच्या एका मुलाने उचललेल्या एका पावलाने आज इतिहास घडवला आहे. या दहा वर्षांच्या मुलाने साधारणपणे तीन दिशकांपूर्वी १९९३ मध्ये आपल्या आईच्या क्रेडिट कार्डवरून केवळ ३०० रुपयांत 'AI.com' हे दोन अक्षरी डोमेन रजिस्टर केले होते. ही, त्या दहा वर्षांच्या मुलाची एक साधी कृती होती. मात्र आज ती डिजिटल जगातील सर्वात मोठी डील ठरली आहे. या मुलाचे नाव अर्स्यान इस्माईल (Arsyan Ismail).
मलेशियातील अर्स्यान इस्माईलने 'AI.com' डोमेन मधील 'AI' हे दोन शब्द केवळ स्वतःच्या नावातील सुरुवातीची अक्षरे असल्याने निवडले होता. त्याचा हा निर्णय एवडा फायदेशीर ठरला की, ज्याने त्याला मालामाल केले. खरे तर, अशी कल्पना तेव्हा कुणालाही नव्हती. अनेक वर्षे हे डोमेन त्याच्याकडेच होते.
कालांतराने तंत्रज्ञान बदलले आणि 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ने (AI) जागतिक स्तरावर क्रांती घडवून आणली. जसजसा एआय उद्योगाचा विस्तार झाला, तसतशी अशा दुर्मिळ आणि लहान डोमेन नेम्सची किंमत गगनाला भिडली. 'AI.com' हे दोन अक्षरी डोमेन या क्षेत्रातील सर्वात मौल्यवान डोमेन बनले.
एप्रिल २०२५ मध्ये, हे डोमेन तब्बल ७० दशलक्ष डॉलर्सना (सुमारे ६०० कोटी रुपये) विकले गेले. विशेष म्हणजे, या संपूर्ण रकमेचा व्यवहार 'क्रिप्टोकरन्सी'मध्ये झाला. महत्वाचे म्हणजे, २०१० मधील 'CarInsurance.com'च्या विक्रीचा विक्रम मोडीत काढत हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सार्वजनिक डोमेन व्यवहार ठरला आहे.
'सुपर बाउल LX' दरम्यान हे डोमेन दुरऱ्यांदा लाँच करण्यात आले. जेथे 'Crypto.com' ‘Agentic AI’ वर फोकस्ड एक नवीन प्लॅटफॉर्म सादर केला. या लाँचमुळे हे स्पष्ट झाले की. ही केवळ डोमेन विक्री नव्हती, तर एआय आणि क्रिप्टो तंत्रज्ञानाच्या संयोजनातील एक ऐतिहासिक क्षण होता. एकंदरीतट, अनावधानाने खरेदी केलेले डोमेन लाखोंना विकले गेले, हे जागतिक इतिहासातील दुर्मिळ उदाहरण आहे.