शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

जिओने बंद केले दोन 'छोटे' प्लॅन; तीन 'मोठे' रिचार्ज प्लॅन लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:21 PM

रिलायन्स जिओनं IUC शुल्क लावल्यानंतर दोन प्लॅन बंद केले आहेत, त्याऐवजी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओनं IUC शुल्क लावल्यानंतर दोन प्लॅन बंद केले आहेत, त्याऐवजी तीन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. आययूसी शुल्क वसूल करणारे प्लॅन्स आल्यानंतर कंपनीनं 19 रुपये आणि 52 रुपयांचे रिचार्ज पॅक बंद केले आहेत. जिओनं 10 ऑक्टोबरला IUCचे चार डेटा प्लॅन भारतीय बाजारात उपलब्ध करून दिले होते. ज्या युजर्सचे जिओ सोडून दुसऱ्या नेटवर्कवर जास्त कॉल होतात, ते या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात. तसेच ग्राहकांना या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा मिळणार आहे. ग्राहकांना 19 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 150 एमबी डेटा मिळत होता. तसेच त्याशिवाय 20 SMSची सुविधाही देण्यात आली होती. दुसरीकडे 52 रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकाला 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. त्याशिवाय 70 SMSचाही लाभ मिळत होता. परंतु जिओनं आता हे दोन्ही प्लॅन्स बंद केले आहेत. तर दुसरीकडे तीन मोठे प्लॅन लाँच केले आहेत. जिओ 222 रुपयांत दरदिवशी 2 जीबी डेटा आणि जिओच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कला फोन केल्यास 1000 मिनिटे मोफत देणार आहे. जिओ 222 रुपयांत महिन्याभर ही सेवा देणार असून, 333 रुपयांत दोन महिने, तर 444 रुपयांत हीच सुविधा तीन महिन्यांसाठी मिळणार आहे. 

रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच युजर्सला नव्या प्लॅनसाठी IUC शुल्क द्यावे लागणार आहेत. त्यासाठी वेगळा आययूसी टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत.  आता युजर्ससाठी 10 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत आययूसी चार्ज पॅक उपलब्ध आहे. 10 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी आणि 100 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी अतिरिक्त डेटा युजर्सना मिळणार आहे. तसेच 10 रुपयांच्या वाउचरमध्ये 124 मिनिटांचं नॉन जिओ टॉकटाईम तर 100 रुपयाच्या वाउचरमध्ये 1,362 मिनिटांचा टॉकटाईम देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने  पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. या वन-टाईम ऑफर प्लॅनच्या घोषणेनंतर पहिल्या 7 दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे.  लवकरच येणार नवीन रिचार्ज प्लॅनरिलायन्स जिओ हे दोन्ही रिचार्ज प्लॅन 2020ला पुन्हा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर ट्राय आययूसीला जानेवारी 2020पर्यंत हटवू शकते. परंतु ट्रायनं आययूसीसंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. काही ग्राहकांनी जिओच्या प्लॅनवर टीका केली आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओ