शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:14 IST

Google-Microsoft Passkey: पासवर्ड विसरा! गुगल-मायक्रोसॉफ्टची नवीन लॉगिन सिस्टम; भारतात येणार 'ही' संकटे

डिजिटल जगात आता पासवर्ड विसरण्याची किंवा तो चोरीला जाण्याची भीती लवकरच इतिहास जमा होणार आहे. टेक दिग्गज गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आता 'पासवर्डलेस लॉगिन'कडे वेगाने पाऊल टाकत असून 'पासकी' ही नवी सुरक्षा यंत्रणा राबवत आहेत. मात्र, भारतासारख्या विशाल बाजारपेठेत ही यंत्रणा पूर्णपणे यशस्वी होण्यासमोर काही मोठी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे.

'पासकी' हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यात तुम्हाला कोणताही शब्द किंवा नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुमच्या फोनमधील फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा स्क्रीन लॉक पिन हीच तुमची पासकी असेल. ही सिस्टम क्रिप्टोग्राफीवर आधारित असल्याने हॅकर्सना तुमचा पासवर्ड चोरणे किंवा फिशिंग करणे अशक्यप्राय होईल.

भारतात का अडकू शकतो 'खेळ'? तज्ज्ञांच्या मते, ही नवीन सिस्टम भारतात काही कारणांमुळे अडथळ्यांची ठरू शकते. भारतात मोठ्या प्रमाणावर जुन्या अँड्रॉइड आवृत्तीचे (Android 9 च्या खालील) फोन्स वापरले जातात, जे पासकीला पूर्णपणे सपोर्ट करत नाहीत.  तसेच ग्रामीण भागात अजूनही साध्या कीपॅड फोनचा किंवा जुन्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अशा ठिकाणी केवळ बायोमेट्रिक्सवर अवलंबून राहणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते. भारतीयांना 'ओटीपी' (OTP) आणि पासवर्डची सवय आहे. अचानक पूर्णपणे पासवर्डलेस होणे युजर्ससाठी गोंधळाचे ठरू शकते. तसेच जर फोन चोरीला गेला किंवा बायोमेट्रिक्समध्ये तांत्रिक बिघाड झाला, तर बॅकअप आणि रिकव्हरीची प्रक्रिया भारतात किती सुलभ असेल, यावर या सिस्टमचे यश अवलंबून आहे.

गुगलने आधीच आपल्या युजर्सना 'पासकी' कडे शिफ्ट होण्याचे आवाहन केले आहे. लवकरच अनेक बँकिंग आणि पेमेंट ॲप्स देखील ही सुविधा स्वीकारतील. हे तंत्रज्ञान सुरक्षित असले तरी, भारतातील तांत्रिक दरी भरून काढण्याचे मोठे आव्हान कंपन्यांसमोर असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Goodbye Passwords? Google & Microsoft's 'Passkey' System Faces India Challenges.

Web Summary : Google and Microsoft's 'Passkey' system aims for passwordless logins. India faces challenges due to older phones, tech divide, and OTP reliance. Success hinges on easy recovery.
टॅग्स :googleगुगल