OnePlus स्मार्टफोन आणि TV मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी; मर्यादित कालावधीसाठी OnePlus Gifting Days सेल सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 01:09 PM2021-08-19T13:09:11+5:302021-08-19T13:09:26+5:30

OnePlus Gifting Days: 12 ऑगस्टपासून OnePlus Gifting Days सुरु झाले आहेत आणि 22 ऑगस्टपर्यंत वनप्लस स्मार्टफोन आणि टीव्ही जिंकता येतील.  

Oneplus gifting days live india you can win free oneplus phone and 32inch tv  | OnePlus स्मार्टफोन आणि TV मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी; मर्यादित कालावधीसाठी OnePlus Gifting Days सेल सुरु 

OnePlus स्मार्टफोन आणि TV मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी; मर्यादित कालावधीसाठी OnePlus Gifting Days सेल सुरु 

googlenewsNext

OnePlus ने भारतात OnePlus Gifting Days सेलची सुरुवात केली आहे. हा सेल 12 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान सुरु राहील. या सेल अंतर्गत वनप्लस डिव्हाइसेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस स्मार्टफोन आणि टीव्ही जिंकण्याची संधी मिळेल. ही ऑफर फक्त ऑफलाईन वनप्लस एक्सपेरियन्स स्टोर्स आणि पारनेर स्टोर्सवरून खरेदी केलेल्या डिव्हाइसेसवर लागू असेल. कंपनी लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्यांची निवड करणार आहे. तामिळनाडू आणि केरळमधील ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही.  

Gizmochina ने वनप्लसच्या OnePlus Gifting Days सेलची माहिती दिली आहे. हा सेल 12 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान भारतात सुरु राहील. या काळात वनप्लस स्मार्टफोन आणि वनप्लस टीव्हीच्या खरेदीवर वनप्लस डिवाइस मोफत जिंकता येतील. ऑफर फक्त OnePlus Experience स्टोर्स आणि Reliance Digital, Croma, Vijay Sales, Bajaj Electronics, My Jio Stores इत्यादी वनप्लस पार्टनर्स स्टोर्सवरून केलेल्या खरेदीवर लागू होईल.  

OnePlus Gifting Days अंतर्गत खरेदी केलेल्या वनप्लस डिवाइसवर OnePlus 9R 5G, OnePlus Buds Z, OnePlus Band, OnePlus Buds Z, OnePlus Band, OnePlus Bullets Wireless Z आणि OnePlus Power Bank जिंकता येतील. तसेच कंपनीने 32 इंचाचा वनप्लस टीव्हीच्या मेगा प्राइजची देखी घोषणा केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने आपला नवीन मिडरेंज OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन सादर केला होता.  

OnePlus Nord 2 5G चे स्पेसिफिकेशन्स   

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन 6.43-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच कारतण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1800 पिक्सल रिजोल्यूशनसह आला आहे. या फ्ल्यूड अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा वनप्लस फोन अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 एआय चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी OnePlus Nord 2 5G मध्ये एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो.   

फोटोग्राफी सेगमेंट पाहता, OnePlus Nord 2 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योटिरीसाठी OnePlus Nord 2 5G मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक असे दोन्ही फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65W वॉर्प चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.    

Web Title: Oneplus gifting days live india you can win free oneplus phone and 32inch tv 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.