Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 03:25 PM2024-06-14T15:25:49+5:302024-06-14T15:27:27+5:30

Yummo Ice Creams: मालाड पोलीस ठाण्यात संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता दोषी कंपनीनं समोर येत आपली बाजू मांडली आहे. 

Yummo Ice Creams responds after Mumbai doctor finds human finger in cone We have stopped | Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."

Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."

मुंबईHuman finger in ice cream in Mumbai: मुंबईत मालाड येथे यम्मो कंपनीच्या (Yummo Ice Creams) आईस्क्रिम कोनमध्ये चक्क तुटलेलं मानवी बोट आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. मालाड पोलीस ठाण्यात संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर आता दोषी कंपनीनं समोर येत आपली बाजू मांडली आहे. 

"सदर आईस्क्रिम ज्या थर्ड पार्टी आईस्क्रिम निर्मात्या यूनिटमध्ये तयार करण्यात आलं होतं तिथलं संपूर्ण काम आम्ही थांबवलं आहे. तसंच त्या युनिटमधून तयार झालेले आणि गोदामात ठेवलेले सर्व प्रोडक्ट आम्ही बाजूला केले आहेत. बाजारातही या युनिटमध्ये तयार झालेले प्रोडक्ट मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने आम्ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत होतो. दरम्यान, हे प्रकरण वाढले आणि ग्राहकाने अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली", अशी माहिती 'यम्मो' (Yummo) कंपनीने आपल्या पत्रकातून अधिकृतरित्या दिली आहे.

मालाडमध्ये स्थायिक असलेल्या ब्रेंडन फेरॉव (२६) आणि त्यांची बहिण जेसिका (२२) हिनं १२ जून रोजी झेप्टो या ॲपवरून पीठ आणि तीन मँगो आइस्क्रीमची ऑर्डर केली. मात्र, त्यांना दोन मँगो आणि एक बटरस्कॉच आइस्क्रीम पाठवण्यात आलं होतं. जेवणानंतर ब्रेंडन व जेसिका यांनी बटरस्कॉच आइस्क्रीम खायला घेतलं असता त्यांच्या तोंडात एक मोठा तुकडा आला. तो नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. या घटनेनं दोन्ही बहिणींना धक्काच बसला. आईस्क्रिम कंपनीकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्याने दोघींनीही पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बोट कुणाचं आहे, याचा तपास करताना आधार कार्ड केंद्राची मदत घेतली जाणार आहे. तसेच त्याची डीएनए चाचणीही करण्यात येणार आहे. फॅक्टरीत घडलेल्या अपघातात एखाद्याचं बोट पॅकेजिंगदरम्यान वेगळं होऊन ते आइस्क्रीममध्ये पडलं असावं. तसेच आइस्क्रीम डुप्लिकेट असल्याचाही संशय असून, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला तपास करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Web Title: Yummo Ice Creams responds after Mumbai doctor finds human finger in cone We have stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई