Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:10 PM2024-06-14T14:10:51+5:302024-06-14T14:13:17+5:30

आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त श्वेता सिंग कीर्तीने पुन्हा एकदा व्यवस्थेकडे न्यायाची मागणी केली आहे.

Sushant Singh Rajput's sister Shweta Singh Kirti pleads for justice on his 4th death anniversary with a heart melting throwback VIDEO | Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज हयात नसला तरी तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला. पण आजही त्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. सुशांतच्या मृत्यूला आज 4 वर्ष झाली आहेत. सुशांतसाठी आजही त्याचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंगने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

आज सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त श्वेता सिंग कीर्तीने पुन्हा एकदा व्यवस्थेकडे न्यायाची मागणी केली आहे. तिने सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत मजा-मस्ती करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत श्वेताने एक भावूक नोट लिहिली आहे.

श्वेताने लिहिलं, 'भाई, तू आम्हाला सोडून गेलास, त्याला आज ४ वर्षे झाली आहेत. अजूनही आम्हाला १४ जून २०२० ला नेमकं काय झालं होतं, हे कळालेलं नाही. आमच्यासाठी तुझा मृत्यू अजूनही एक गूढ आहे. मला असहाय्य वाटतंय. सत्य जाणून घेण्यासाठी कित्येक अधिकाऱ्यांना मी विनंती केली. पण, आता मी धीर गमावत चालले आहे. असं वाटतं सर्व काही सोडून द्यावं, हार मानावीशी वाटतेय'.

श्वेताने पुढे लिहिले की, 'आज, शेवटचं मला या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचं आहे, तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा, आमचा भाऊ सुशांतचं काय झालं हेसुद्धा जाणून घ्यायचा आमचा हक्क नाही का?  हा एक राजकीय अजेंडा का बनला आहे?  त्यादिवशी जे काही सापडलं असेल आणि जे काही घडलं असेल ते सहजतेने का सांगितलं जात नाहीये.  मी विनंती करतेय की सत्य सांगून आमच्या कुटुंबाला पुढे जाण्यास मदत करा', असं श्वेताने पोस्टमध्ये लिहलं आहे. 

श्वेताने आणखी एका पोस्टमधून सुशांत अन्यायाला पात्र आहे का? असं विचारलं आहे. तिने लिहिलंय की, 'या क्रूर जगात इतकं प्रेमळ आणि निर्मळ असणं ही त्याची चूक होती का? सुशांतवर अन्याय होऊन चार वर्षे झाली. तो ह्यासाठी खरंच पात्र आहे का?'. या पोस्टवर सुशांतच्या चाहत्यांनीदेखील न्यायाची मागणी केली आहे.  

Web Title: Sushant Singh Rajput's sister Shweta Singh Kirti pleads for justice on his 4th death anniversary with a heart melting throwback VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.