'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 01:53 PM2024-06-14T13:53:59+5:302024-06-14T13:55:01+5:30

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 19 जूनला होईल.

Sunita should be allowed CM Arvind Kejriwal's new plea to the court; cm kejriwal files two application | 'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी राऊज एव्हेन्यू न्यायालयात दोन अर्ज दाखल करत पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासंदर्भात काही परवानग्या मागितल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, आज केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. याच वेळी त्यांनी हे दोन अर्ज सादर केले.

...म्हणून ईडीने उत्तर देण्याची आवश्यकता नाही - 
या अर्जांवर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागीतला होता. मात्र, केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, एजन्सीच्या कोठडीत नाहीत. यामुळे या अर्जांवर एजन्सीने उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या दोन पत्रांत काय? -
- सुनीता केजरीवाल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी.
- मेडिकल बोर्ड जेव्हा जेव्हा बसेल, तेव्हा-तेव्हा आम्हाला आमचे इनपुट देण्याची परवानगी देण्यात यावी.

19 जूनला जामिनावर नियमित सुनावणी -
याशिवाय, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन याचिकेवर पुढील सुनावणी 19 जूनला होईल.

Web Title: Sunita should be allowed CM Arvind Kejriwal's new plea to the court; cm kejriwal files two application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.