लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 02:54 PM2024-06-14T14:54:41+5:302024-06-14T15:20:59+5:30

WhatsApp : WhatsApp जगभरात खूप लोकप्रिय आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही ठिकाणी याचा वापर हमखास केला जातो.

whatsapp update get 32 participants on video call and more feature | लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल

लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp जगभरात खूप लोकप्रिय आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही ठिकाणी याचा वापर हमखास केला जातो. आपल्या युजर्ससाठी WhatsApp सतत नवनवीन दमदार फीचर्स आणत असतं. WhatsApp आता व्हिडीओ कॉलची गंमत वाढणार आहे. कारण तुम्ही आता तब्बल ३२ लोकांना यामध्ये अॅड करू शकता.

तुम्ही आता ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये ३२ लोकांना अॅड करू शकता. याशिवाय WhatsApp व्हिडीओ कॉलमध्ये ऑडिओसोबत स्क्रीन शेअरिंगचा पर्यायही आला आहे. तसेच स्पीकर स्पॉटलाइट फीचर जोडण्यात आलं आहे. म्हणजेच व्हिडीओ कॉलमध्ये बोलणारी व्यक्ती स्क्रीनवर आपोआप हायलाइट होईल.

हे सर्व फिचर लवकरच सर्व युजर्सपर्यंत पोहोचतील. येत्या काही आठवड्यात ते रोलआऊट केलं जाणार आहे. यासोबतच कंपनी चांगल्या ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल क्वालिटीवर लक्ष केंद्रित करत आहे. यासोबतच कंपनीने नवीन MLow कोडेक लाँच केलं आहे. त्याच्या मदतीने युजर्सला कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल. 

फास्ट कनेक्टिव्हिटीवर व्हिडीओ कॉलमध्ये हायरर रिझोल्यूशन उपलब्ध असेल. ऑडिओ क्वालिटी देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल. WhatsApp चं नवीनतम अपडेट व्हिडीओ कॉलवर फोकस्ड केलेलं आहे. हे सर्व फीचर्स असल्याने झूम आणि मायक्रोसॉफ्ट टीम्सला टक्कर देणार आहे. 
 

Web Title: whatsapp update get 32 participants on video call and more feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.