Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भविष्यात कोण जिंकेल एआय की मानवी स्किल्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:09 IST2026-05-08T14:08:54+5:302026-05-08T14:09:47+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: पण एक प्रश्न अनेकांना पडतो भविष्यात एआय माणसापेक्षा श्रेष्ठ ठरेल का?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: भविष्यात कोण जिंकेल एआय की मानवी स्किल्स?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. मोबाइल, कॉम्प्युटर, इंटरनेट यामुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. या सगळ्यामागे एक महत्त्वाची गोष्ट काम करते, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेन्श (एआय). आज एआय आपल्या अभ्यासात, खेळात आणि दैनंदिन आयुष्यातही मदत करत आहे. पण एक प्रश्न अनेकांना पडतो भविष्यात एआय माणसापेक्षा श्रेष्ठ ठरेल का?
एआय काय करू शकतो?
एआय खूप वेगाने आणि अचूकपणे काम करतो. तो काही सेकंदात अवघड गणितं सोडवू शकतो, मोठ्या प्रमाणात माहिती शोधू शकतो आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण मोबाइलवर काहीही सर्च करतो. व्हाइस असिस्टंटला प्रश्न विचारतो किंवा ऑनलाइन स्टडी अॅप वापरतो हे सगळं एआयमुळे शक्य होतं. एआय कधी थकत नाही, चुकण्याची शक्यता कमी असते आणि तो सतत काम करु शकतो. त्यामुळे अनेक ठिकाणी एआय खूप उपयोगी ठरत आहे.
माणसात काय खास आहे?
माणूस फक्त माहिती लक्षात ठेवत नाही, तर तो विचार करतो, नवीन कल्पना निर्माण करतो आणि भावना समजतो. एखादा शिक्षक विद्यार्थ्याला शिकवताना त्याच्या अडचणी समजून घेतो, त्याला प्रोत्साहन देतो. मित्र दुःखी असेल तर त्याला समजून घेऊन मदत करणे हे माणसालाच जमतं. माणूस चुका करतो, पण त्या चुकांमधून शिकतो. तो नवीन प्रश्न विचारतो. नवीन शोध लावतो आणि जग बदलतो. ही सर्जनशीलता एआयकडे अजूनही पूर्णपणे नाही.
विद्यार्थ्यांनी काय शिकावे?
फक्त मोबाइल वापरणे किंवा माहिती मिळवणे पुरेसे नाही.
विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे
स्वतः विचार करण्याची सवय.
नवीन प्रश्न विचारणे.
सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) वाढवणे.
इतरांशी चांगला संवाद साधणे.
योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
ही कौशल्ये कोणत्याही मशीनकडे नसतात आणि तीच तुमची खरी ताकद आहे.
थोडक्यात महत्त्वाचे
एआय = वेग, अचूकता, माहिती.
मानवी स्किल्स = विचार, भावना, सर्जनशीलता.
दोघे मिळूनच भविष्य घडवतील.
स्मार्ट विद्यार्थी तोच जो एआय वापरतो आणि स्वतःही विचार करतो.
Moral
Artificial Intelligence can support your learning, solve problems, and make life easier, but it can never replace your imagination, emotions, and ability to think independently. The real power lies in how wisely you use technology. Always remember, machines can follow instructions, but only humans can create, dream, and lead. So, use Al as your helper, not your replacement, and keep your mind active, curious, and
creative.
मग कोण जिंकेल?
हा प्रश्न जरा वेगळा आहे. कारण ही स्पर्धा नाहीच! एआय आणि माणूस दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून, सहकारी आहेत. एआय आपल्याला मदत करतो. अभ्यास सोपा करतो, माहिती देतो, वेळ वाचवतो. पण योग्य निर्णय घेणे, योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक करणे, हे माणसालाच करावे लागते.
- इंजि. अविनाश जाधव (एआय अॅण्ड टेक एज्युकेटर)