Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डेटा सायन्समधील क्रांतीमुळे विद्यार्थ्यांना खुले झाले नवे विश्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:17 IST2026-04-13T13:17:33+5:302026-04-13T13:17:47+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा विषय भविष्यातली मोठी संधी ठरताना दिसत आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डेटा सायन्समधील क्रांतीमुळे विद्यार्थ्यांना खुले झाले नवे विश्व
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचा काळ 'डेटा'चा आहे. आपण दैनंदिन आयुष्यात मोबाईल वापरतो, ऑनलाइन खरेदी करतो, डिजिटल पेमेंट करतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो, या प्रत्येक ठिकाणी डेटा तयार होतं असतो. या डेटाचे विश्लेषण करून निर्णय घेण्याचे तंत्र म्हणजे डेटा सायन्स (Data Science). महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा विषय भविष्यातली मोठी संधी ठरताना दिसत आहे.
डेटा सायन्स म्हणजे नेमके काय?
मोठ्या प्रमाणातील माहिती (Data) गोळा करणे, तो साठवणे किंवा विश्लेषण करणे आणि त्यातून उपयोगी निष्कर्ष काढणे यालाच डेटा सायन्स म्हणतात.
उदा : कोणत्या भागात पाऊस जास्त पडतो? कोणत्या पिकाला कोणत्या महिन्यात जास्त मागणी असते? विद्यार्थ्यांचा कोणता विषयात निकाल कमी लागतो? ही आशा प्रकारची सर्व उत्तरे डेटा विश्लेषणातून आपल्याला मिळतात.
डेटा सायन्समध्ये आपण काय शिकावे?
डेटा सायन्स हा अनेक विषयांचा संगम आहे. यात गणित आणि सांख्यिकी (Statistics), संगणक प्रोग्रामिंग (Python, R), मशीन लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन असे अनेक पर्याय डेटा सायन्समध्ये उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी करिअर संधी
विद्यार्थ्यांनी शाळेपासूनच प्रामुख्याने गणित आणि संगणक विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
Data Analyst
Data Scientist
Business Intelligence Expert
AI Researcher
Machine Learning Engineer
आज कंपन्या निर्णय घेण्यासाठी डेटावर अवलंबून आहेत. त्यामुळे आशा अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रासाठी फायदा
महाराष्ट्रात औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्र मोठ्या या प्रमाणात विकसित आहे. त्यात डेटा सायन्सचा वापर विविध क्षेत्रात होताना दिसत आहे.
कृषी क्षेत्रात उत्पादनाचा अंदाज घेणे.
शहर नियोजन हाताळणे.
वाहतूक व्यवस्थापन
आरोग्य विभागात रोगांचे विश्लेषण करणे.
स्पर्धा परीक्षांचे गुणांचे विश्लेषण करणे.
या अनुषंगाने मागणी बघता पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर डेटा सायंटिस्ट्सची नियुक्ती करत आहेत.
नैतिकता आणि जबाबदारी
डेटा म्हणजे केवळ आकडे नसतात; त्यात व्यक्तींची माहितीसुद्धा असते त्यामुळे डेटा वापरताना गोपनीयता आणि नैतिकतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. चुकीचा डेटा कधीही चुकीचा निर्णय देऊ शकतो.
मूलबोध
आगामी काळात 'डेटा साक्षरता' हे सर्वांचे मूलभूत कौशल्य ठरेल. महाराष्ट्रातील विद्यार्थी जर डेटा समजून घेऊ लागले तर ते प्रशासन, उद्योग, शेती आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी बदल घडवू शकतात यात शंका नाही.
'Power of Data Science'
Data Science transforms raw information into meaningful insights. In a digital world, data-driven decisions shape industries and careers.
Moral Numbers tell stories those who understand them shape the future.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)