Lokmat AI ची अद्भूत दुनिया: काही वर्षांपूर्वी लोकांनी एक चित्रपट पाहिला आणि आश्चर्यचकित झाले. त्या चित्रपटात यंत्र जगावर नियंत्रण मिळवतात आणि माणसं एका आभासी जगात जगत असतात. त्या जगात सर्व काही खरे वाटते; पण ते प्रत्यक्षात खरे नसते. हा विचार विज्ञानकथेसारखा वाटत होता; पण आजच्या काळात हा प्रश्न पुन्हा समोर येतो. आपण खरोखरच डिजिटल मॅट्रिक्समध्ये जगतो आहोत का?
आज आपण सकाळी उठलो की सर्वप्रथम मोबाइल पाहतो. दिवसाची सुरुवात बातम्या, संदेश, सोशल मीडिया स्क्रीनपासून होते. एआय आपल्याला कोणती बातमी वाचायची, कोणता व्हिडिओ पाहायचा, कोणते गाणे ऐकायचे हे सुचवत असतो. हळूहळू आपण लक्षातही घेत नाही की आपले अनेक निर्णय आपण घेत नाही, ते सुचवले जातात. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ती आपल्याला मदत करते, काम सोपे करते, वेळ वाचवते. एआयमुळे नकाशे आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. ऑनलाइन खरेदी करताना आपल्याला आवडतील अशा वस्तू सुचवल्या जातात.
मोबाइलमध्ये फोटो आपोआप वर्गीकृत होतात. हे सगळं सोयीचं आहे; पण सोयीबरोबर एक प्रश्न उभा राहतो नियंत्रण नेमकं कोणाकडे आहे? आपण मशीन वापरतो की मशीन आपल्याला वापरतात? आज एआय आपल्याला माहिती देतो. उद्या तो आपल्याला निर्णय सुचवतो. परवा कदाचित तो आपल्यासाठी निर्णय घेऊ लागेल. ही भीती दाखवण्याची गोष्ट नाही, पण विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की आपण मोबाइल वापरतो; पण कधी कधी मोबाइल आपल्याला वापरतो. आपण दोन मिनिटांसाठी सोशल मीडिया उघडतो आणि अर्धा तास कसा जातो कळतही नाही. एखादा व्हिडिओ संपला की लगेच दुसरा सुरू होतो. हे सगळं योगायोगाने होत नाही.
अल्गोरिदम आपल्याला स्क्रीनवर ठेवण्यासाठी बनवलेले असतात. एआय हे एक साधन आहे. चाकूने भाजीही कापता येते आणि दुखापतही करता येते. तसंच एआय आहे. खरा प्रश्न एआयचा नाही, खरा प्रश्न जागरूकतेचा आहे. भारतीय परंपरेत एक प्रार्थना आहे 'तमसो मा सद्गमय'. याचा अर्थ आहे अंधारातून प्रकाशाकडे ने. आज या वाक्याचा एक नवीन अर्थ समोर येतो. डिजिटल अंधार म्हणजे माहितीचा अतिरेक, सततचा स्क्रीन टाइम, विचार न करता केलेले निर्णय. आणि प्रकाश म्हणजे जागरूकता. तंत्रज्ञान वापरताना आपण विचार करतो का?
भविष्यात तीन शक्यता दिसतात
पहिली मशीन नियंत्रणात येतील. लोक मशीनवर पूर्ण अवलंबून राहतील. प्रत्येक निर्णय एआय घेईल. माणूस फक्त सूचना पाळेल.
दुसरी मोठ्या कंपन्या नियंत्रणात राहतील. माहिती, डेटा आणि अल्गोरिदम यांच्या मदतीने लोकांच्या निवडी बदलल्या जातील. लोकांना वाटेल की ते स्वतंत्र आहेत; पण त्यांच्या निवडी आधीच ठरवल्या गेल्या असतील.
तिसरी जागरुक माणूस नियंत्रणात राहील. माणूस एआय वापरेल, पण स्वतः विचार करणे सोडणार नाही. मशीन मदत करतील; पण निर्णय माणूस घेईल.
तिसरी शक्यता सर्वात चांगली आहे आणि सर्वात कठीणही. आज एआयमुळे जीवन सोपं होत आहे; पण सोपं जीवन म्हणजे चांगलं जीवन असंच नसतं. कधी कधी कठीण निर्णय माणसाला मजबूत बनवतात. जर एआय आपल्याला सगळं सांगणार असेल काय शिकायचं, काय खरेदी करायचं, कुठे जायचं, तर हळूहळू आपली निर्णयक्षमता कमी होऊ शकते.
Moral
Arjun loved virtual reality games. With his headset on, he could explore cities, fight battles, and climb mountains without leaving his room. One day his teacher invited him for a trek. Arjun hesitated but agreed. The climb was tiring, the sun was harsh, and his legs hurt. But when he reached the top, he saw the real valley, the wind on his face, and the endless sky. It felt different from any simulation. On the way back he realized something important -machines can create experiences, but they cannot replace reality.
डिजिटल मॅट्रिक्स
मोबाइलशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. एआय काय पाहायचे ते सुचवतो. सोशल आपले लक्ष धरुन मीडिया ठेवतो. ऑनलाइन जग वास्तव वाटते. माहिती भरपूर आहे; पण लक्ष कमी आहे. स्क्रीनवर वेळ नकळत वाढतो. नियंत्रण आपल्या हातात कसे ठेवायचे तंत्रज्ञान वापरा. त्यावर अवलंबून राहू नका.
- अजिंक्य देशमुख
Web Summary : Are we in a digital matrix? AI simplifies life but risks control. Awareness is key. Choose conscious tech use over dependence to retain decision-making.
Web Summary : क्या हम डिजिटल मैट्रिक्स में हैं? एआई जीवन को आसान बनाता है, पर नियंत्रण का खतरा है। जागरूकता ज़रूरी है। निर्णय लेने की क्षमता बनाए रखने के लिए सोच-समझकर तकनीक का उपयोग करें।