Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील टप्पे : कल्पनेतून वास्तवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 20:49 IST2026-04-26T20:48:57+5:302026-04-26T20:49:38+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: त्या काळात एआय म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान असं मानलं जायचं.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासातील टप्पे : कल्पनेतून वास्तवात
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एकेकाळी एआय म्हणजे फक्त कल्पना होती. नव्वदच्या दशकात संगणक आणि रोबोट यांच्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल होतं, पण मशीन विचार करू शकते, ही गोष्ट अविश्वसनीय वाटायची. एखाद्या चित्रपटात किंवा विज्ञानकथेत आपण बोलणारे रोबोट पाहायचो. पण ते वास्तवात कधी येईल, याची कल्पनाही नव्हती. त्या काळात एआय म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञान असं मानलं जायचं.
आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एआय आता प्रयोगशाळेत किंवा चित्रपटात मर्यादित राहिलेला नाही. तो आपल्या मोबाईलमध्ये, संगणकात आणि दैनंदिन आयुष्यात आला आहे. आपण इंटरनेटवर काही शोधतो, मोबाईल आपल्याला योग्य शब्द सुचवतो, फोटो ओळखतो, आवाज ओळखतो या सगळ्यांमागे एआय काम करत असतो. अनेकांना हे कळतही नाही की ते रोज एआय वापरत आहेत.
एआय अचानक तयार झालेला नाही. तो अनेक वर्षांच्या संशोधनातून आणि विकासातून तयार झाला आहे. सुरुवातीला संगणक फक्त गणिती गणना करू शकत होते. नंतर ते माहिती साठवू लागले. त्यानंतर इंटरनेट आलं आणि जगभरातील माहिती उपलब्ध झाली. पुढे स्मार्टफोन आले आणि संगणक आपल्या खिशात आला. या सर्व टप्प्यांमधून एआय हळूहळू विकसित झाला. एआय म्हणजे जादू नाही. एआय म्हणजे माहिती आणि गणित यांचा उपयोग करून निर्णय घेण्याची पद्धत आहे. एआय भूतकाळातील आणि वर्तमानातील मोठ्या प्रमाणावर डेटा पाहतो आणि त्यातून पॅटर्न शोधतो.
उदाहरणार्थ, तुम्ही मोबाईलवर वारंवार एखादं गाणं ऐकलंत तर मोबाईल तुम्हाला तशाच प्रकारची गाणी सुचवतो. हा अंदाज असतो, भविष्यवाणी नाही. आज एआय अनेक क्षेत्रांत उपयोगी ठरत आहे. आरोग्य क्षेत्रात डॉक्टरांना आजार ओळखायला मदत होते. शेतीत हवामानाचा अंदाज मिळतो. शिक्षणात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकतं.
व्यवसायात ग्राहकांच्या गरजा समजून घेता येतात. या सगळ्यांमुळे काम वेगाने आणि अचूकपणे होऊ शकतं. पण एआयबद्दल भीतीही आहे. काही लोकांना वाटतं की, एआय माणसांची जागा घेईल. काहींना वाटतं की, मशीन माणसांवर नियंत्रण ठेवतील. अशा कल्पना अनेकदा चित्रपटांमुळे तयार होतात. प्रत्यक्षात एआय स्वतः निर्णय घेत नाही. एआयला डेटा दिला जातो आणि माणूसच त्याचा उपयोग करतो.
Moral Story
Rohan loved new technology. One day he heard people say that artificial intelligence could answer any question. He began asking it everything homework, ideas, even small decisions. Soon he stopped thinking on his own. During a School quiz, he had no device to help him. He knew the topics but struggled to answer because he had never tried to understand them himself. After that day, Rohan used AI differently. He still asked questions, but he checked answers and thought carefully. He realized that machines can guide us, but they cannot replace our minds.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे टप्पे
सुरुवातीचे संगणक - फक्त गणिती कामे.
इंटरनेटचा काळ - माहिती उपलब्ध झाली.
स्मार्टफोन - तंत्रज्ञान खिशात आलं.
शोधयंत्र (Search Engines) - माहिती पटकन मिळू लागली.
आवाज आणि फोटो ओळख मशीन शिकू लागले -
आजचा एआय - संवाद आणि विश्लेषण
- अजिंक्य देशमुख