Lokmat AI ची अद्भूत दुनिया: ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता : डिजिटल व्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:07 IST2026-04-14T07:07:07+5:302026-04-14T07:07:07+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: या दोन्ही तंत्रज्ञानांचा संगम भविष्यातील डिजिटल व्यवस्थेचा पाया ठरू शकतो.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता : डिजिटल व्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डिजिटल अर्थव्यवस्थेच्या नव्या टप्प्यात दोन महत्त्वाची तंत्रज्ञान शाखा वेगाने विकसित होत आहेत. ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय). ब्लॉकचेन डेटा सुरक्षित, पारदर्शक आणि अपरिवर्तनीय ठेवण्याची क्षमता देते, तर AI मोठ्या प्रमाणातील डेटाचे विश्लेषण करून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढते. या दोन्ही तंत्रज्ञानांचा संगम भविष्यातील डिजिटल व्यवस्थेचा पाया ठरू शकतो.
ब्लॉकचेन ही मूलतः वितरित लेजर प्रणाली आहे. पारंपरिक डेटाबेसप्रमाणे ती एका केंद्रिकृत सर्व्हरवर अवलंबून राहत नाही. त्याऐवजी नेटवर्कमधील अनेक संगणकांवर एकाच डेटाची प्रत साठवली जाते. प्रत्येक व्यवहार 'ब्लॉक' मध्ये नोंदवला जातो आणि तो क्रिप्टोग्राफिक हॅशच्या साहाय्याने मागील ब्लॉकशी जोडला जातो. त्यामुळे एकदा नोंदवलेली माहिती बदलणे अत्यंत कठीण होते. यामुळे डेटा विश्वासार्ह आणि छेडछाड-प्रतिरोधक बनतो.
दुसरीकडे, कृत्रिम बुद्धिमत्ता ही अल्गोरिदम, सांख्यिकी आणि संगणकीय मॉडेल्सवर आधारित प्रणाली आहे जी डेटामधील नमुने ओळखते आणि भविष्यातील अंदाज बांधते. एआय प्रणालीला अचूक निर्णय घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि विश्वसनीय डेटा आवश्यक असतो. जर डेटा चुकीचा, अपूर्ण किंवा फेरफार केलेला असेल तर एआयचे निष्कर्षही चुकीचे ठरू शकतात.
ब्लॉकचेन म्हणजे डेटा ब्लॉक्सच्या साखळीत साठवणे
प्रत्येक ब्लॉकमध्ये व्यवहार किंवा माहिती, वेळ, मागील ब्लॉकचा हॅश (Digital Signature). एकदा डेटा नोंदवला की तो बदलणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच ब्लॉकचेनला "ट्रस्ट टेक्नॉलॉजी' म्हटले जाते.
विद्यार्थ्यांसाठी ब्लॉकचेनचा उपयोग
कल्पना करा,
बोर्ड परीक्षेचे प्रमाणपत्र ब्लॉकचेनवर नोंदलेले आहे.
एआय त्या डेटावर आधारित विद्यार्थ्यांची कौशल्ये विश्लेषित करते.
करिअर मार्गदर्शन वैयक्तिक पातळीवर दिले जाते.
महाराष्ट्रात जमीन नोंदणी, शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणी, सहकारी बँका आणि त्यांचे व्यवहार यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो.
Al + Blockchain: Smart & Secure Future
Blockchain ensures secure and tamper-proof data, while AI analyzes that data to generate intelligent insights. Together, they create a transparent and intelligent digital ecosystem. Secure your data with blockchain, and empower it with AI.
करिअरच्या संधी
विद्यार्थ्यांसाठी नवीन क्षेत्रे :
AI Blockchain Developer.
Smart Contract Engineer.
Data Security Analyst.
Web3 & AI Architect.
यासाठी प्रोग्रामिंग, क्रिप्टोग्राफी, डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे ते अवगत करून आपण सहज यात करिअर करू शकतो. आगामी काळात डिजिटल ओळख, शैक्षणिक प्रमाणपत्रे, बँकेचे व्यवहार आणि आरोग्याच्या नोंदी या सर्व गोष्टी सुरक्षित आणि बुद्धिमान प्रणालीवर आधारित असतील. एआय आणि ब्लॉकचेनचा संगम डिजिटल जगाला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम बनवू शकतो यात शंका नाही.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)