टीव्ही पहायचा की नाही...! जिओ हॉटस्टारचे प्लॅन ७०० रुपयांनी महागले; नवे दर 'या' तारखेपासून लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:32 IST2026-01-20T12:30:52+5:302026-01-20T12:32:10+5:30

JioHotstar New Plans 2026: JioHotstar ने प्रीमियम आणि सुपर सबस्क्रिप्शन प्लॅन्सच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. वार्षिक प्रीमियम प्लॅन आता ₹२,१९९ ला मिळणार. २८ जानेवारी २०२६ पासून नवे दर लागू.

JioHotstar Price Hike 2026: Whether to watch TV or not...! Jio Hotstar plans become more expensive by Rs 700; New rates effective from 'this' date | टीव्ही पहायचा की नाही...! जिओ हॉटस्टारचे प्लॅन ७०० रुपयांनी महागले; नवे दर 'या' तारखेपासून लागू

टीव्ही पहायचा की नाही...! जिओ हॉटस्टारचे प्लॅन ७०० रुपयांनी महागले; नवे दर 'या' तारखेपासून लागू

मुंबई: रिलायन्स आणि डिस्ने यांच्या विलीनीकरणानंतर तयार झालेल्या JioHotstar या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आपल्या सबस्क्रिप्शन दरांमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. विशेषतः प्रीमियम आणि सुपर प्लॅन्सच्या वार्षिक आणि त्रैमासिक शुल्कात ४७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर २८ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

नेमकी किती झाली दरवाढ?
कंपनीने आपल्या 'प्रीमियम' आणि 'सुपर' अशा दोन्ही श्रेणींमध्ये दरवाढ केली आहे. नव्या रचनेनुसार दर खालीलप्रमाणे असतील:

प्लॅन प्रकारकालावधीजुनी किंमतनवीन किंमत (२८ जाने पासून)
प्रीमियम (Premium)वार्षिक₹१,४९९₹२,१९९
प्रीमियम (Premium)त्रैमासिक₹४९९₹६९९
सुपर (Super)वार्षिक₹८९९₹१,०९९
सुपर (Super)त्रैमासिक₹२९९₹३४९


स्वस्त पर्यायांची मेजवानी: ₹७९ चा नवा प्लॅन
एकडे दरवाढ झाली असली, तरी कंपनीने कमी बजेट असलेल्या युजर्ससाठी मासिक प्लॅन्स सादर केले आहेत. मोबाईल युजर्स आता केवळ ₹७९ मध्ये महिनाभराचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतील.

सुपर आणि प्रीमियम मासिक
सुपरसाठी ₹१४९ आणि प्रीमियमसाठी ₹२९९ असे मासिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हॉलीवूड कंटेंटसाठी वेगळे पैसे?
नव्या नियमांनुसार, 'सुपर' आणि 'प्रीमियम' युजर्सना हॉलीवूड कंटेंट मोफत मिळेल. मात्र, मोबाईल प्लॅन घेणाऱ्यांना इंटरनॅशनल मूव्हीज आणि सिरीज पाहण्यासाठी स्वतंत्र हॉलीवूड एड-ऑन घ्यावा लागेल, ज्याची किंमत मासिक ₹४९ पासून सुरू होते.

विद्यमान युजर्सचे काय?
ज्या ग्राहकांचे सबस्क्रिप्शन आधीच सक्रिय आहे आणि ज्यांनी ऑटो-रिन्यूअल (Auto-renewal) सुरू ठेवले आहे, त्यांना सध्याच्या जुन्या दरानेच सेवा मिळत राहील. नवीन दर केवळ नवीन ग्राहकांसाठी किंवा २८ जानेवारीनंतर प्लॅन रिन्यू करणाऱ्यांसाठी असतील.

Web Title : जियो हॉटस्टार के प्लान हुए महंगे; नई दरें 28 जनवरी, 2026 से लागू

Web Summary : जियो हॉटस्टार ने सब्सक्रिप्शन दरों में बढ़ोतरी की है, खासकर प्रीमियम और सुपर प्लान में 47% तक। नई दरें 28 जनवरी, 2026 से लागू होंगी। मोबाइल उपयोगकर्ताओं के लिए ₹79 का मासिक प्लान उपलब्ध है। ऑटो-नवीनीकरण वाले मौजूदा ग्राहक पुरानी दरों पर बने रहेंगे।

Web Title : JioHotstar Plans Get Costlier; New Rates Effective January 28, 2026

Web Summary : JioHotstar has increased subscription rates, especially for Premium and Super plans, by up to 47%. New rates start January 28, 2026. A ₹79 monthly plan is available for mobile users. Existing subscribers with auto-renewal will retain old rates.