how to find who visited your facebook profile | मस्तच! ब्लॉकनंतरही लपून-छपून तुमचं फेसबुक प्रोफाईल कोण-कोण पाहतंय माहितीय का?; असं करा चेक 

मस्तच! ब्लॉकनंतरही लपून-छपून तुमचं फेसबुक प्रोफाईल कोण-कोण पाहतंय माहितीय का?; असं करा चेक 

नवी दिल्ली - फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी मिनिटा-मिनिटाला लोक आपली माहिती शेअर करत असतात. मात्र अनेकदा आपल्या सोशल फ्रेंडशीपमध्ये काही खटके उडालेले असते. यानंतर लोक एकमेकांना ब्लॉक करतात. मात्र यामध्ये काही जण चोरून प्रोफाईल चेक करीत असतात. अनेकदा आपलं प्रोफाईल हे नेमकं कोण पाहतं हे जाणून घ्यायची उत्सुक असते. आता हे सहज समजणार आहे. तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन चेक करू शकता की, तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं आहे. अन्य युजर्स डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मदत घेऊ शकतात.

पहिली पद्धत

- सर्वात आधी डेस्कटॉप वर फेसबुकला लॉगिन करा.

- आता आपल्या टाईमलाईनवर कुठेही उजव्या बाजुला क्लिक करून View page source ला किंवा CTRL+U दाबा.

- आता ctrl+f दाबून सर्च बारमध्ये BUDDY_ID ला सर्च करा.

- तुम्हाला BUDDY_ID सोबत 15 अंकांचा एक कोड मिळेल.

- या कोडला कॉपी करून आणि ब्राऊजरला facebook.com/profile ID (15 अंकांचा कोड) टाईप करून सर्च करा.

-  आता थेट त्यांचं प्रोफाईल ओपन होईल. ज्याने या आयडीने तुमचं प्रोफाईल चेक केलं आहे.


दुसरी पद्धत

- दुसरी पद्धत ही आहे की, यासाठी तुम्हाला क्रोम एक्सटेंशनची मदत घेता येईल.

- गुगल क्रोममध्ये Super Viewer for Facebook सारखे एक्सटेंशनला डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता की, तुमचं प्रोफाईल कोणी कोणी पाहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! आता तुमच्या पोस्टवर कोणी कमेंट करायची हे तुम्हीच ठरवा; Facebook ने आणलं जबरदस्त फीचर

फेसबुकवर अनेकदा एखादी पब्लिक पोस्ट केल्यानंतर खूप जण त्यावर कमेंट करतात. त्यामध्ये काही असे लोक असतात, ज्यांनी कमेंट केलेलं आपल्याला अजिबात आवडत नाही. मग तेव्हा आपण अशा लोकांना सरळ ब्लॉक करतो. युजरची ही समस्या आता फेसबुक लवकरच दूर करणार आहे. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच असं नवीन फीचर आणणार आहे, ज्यामध्ये युजर्स आपल्या पब्लिक पोस्टबाबत निर्णय घेऊ शकणार आहेत. आपल्या पोस्टवर कोणत्या व्यक्तीने कमेंट करावी आणि कोणी करू नये हे आता युजर्सना ठरवता येणार आहे. तसेच फेसबुक युजर्सला फीड फिल्टर बारचा उपयोग करुन आपल्या न्यूज फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राउज करण्याचाही पर्याय मिळेल.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

English summary :
how to find who visited your facebook profile

Web Title: how to find who visited your facebook profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.