Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या.. 

By Ravalnath.patil | Published: November 23, 2020 03:20 PM2020-11-23T15:20:45+5:302020-11-23T15:21:35+5:30

Google : नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे.

google to soon launch rebranded version of phone by google give tough competition to truecaller  | Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या.. 

Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या.. 

googlenewsNext
ठळक मुद्देगुगलने आपले डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पे (Google Pay) पूर्णपणे रिडिझाइन केले आहे.

नवी दिल्ली : दिग्गज टेक कंपनी गुगलने (Google) आपल्या खास अ‍ॅप Phone by Google चे नवीन व्हर्जन लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे. या आगामी मोबाइल अ‍ॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. तसेच, कंपनी या अ‍ॅपद्वारे Truecaller अ‍ॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

मोबाइल इंडियनच्या एका वृत्तानुसार, रेडडिटरने (Redditor ) गुगलच्या या आगामी कॉलिंग अ‍ॅप गुगल कॉलला यूट्यूबच्या जाहिरातीवर स्पॉट केले आहे. युट्यूबवर पाहिलेल्या या जाहिरातीमध्ये 'lets you answer with confidence' अशी टॅगलाइन वापरली आहे.

Google Call अ‍ॅपची लॉन्चिंग
गुगलने अद्याप गुगल कॉल लाँचिंग करण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हे अ‍ॅप सुरू होईल, अशी आशा आहे. दरम्यान, गुगलचा फोन अ‍ॅप अँड्राईड युजर्ससाठी आहे. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे, फोन स्क्रीन लॉक झाल्यानंतरही युजर्सला कॉलरच्या नावाची माहिती समजते. कंपनीने अलीकडेच या अ‍ॅपसाठी अनेक फीचर्स जारी केले होते.

Google Pay अ‍ॅपमध्ये बदल
गुगलने आपले डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पे (Google Pay) पूर्णपणे रिडिझाइन केले आहे. नवीन बदलामुळे गुगल पे युजर्सला पैशांची बचत करण्यात मदत मिळेल, असा दावा गुगलने केला आहे. तसेच, युजर्स आपल्या खर्चावर लक्ष ठेवू शकतील. मात्र, गुगलकडून सुरुवातीला गूगल पेमधील बदल हे फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी करण्यात आले आहेत. तर भारतासह जगभरातील युजर्ससाठी सुद्धा लवकरच गुगल पे संबंधी अपटेड देण्यात येतील.

गुगल पेच्या जुन्या अ‍ॅपमध्ये तुम्हाला बँक कार्ड डिटेल्स आणि अलीकडील ट्रांजक्शन होम पेजवर दिसून येत होते. मात्र, नवीन गुगल पे अ‍ॅपमध्ये केवळ ट्रांजक्शन डिटेल्स सापडणार नाही तर युजर्स आपला दररोजचा खर्च तपासून पाहू शकतात. नवीन अ‍ॅपमध्ये आपल्याला डिजिटल पेमेंटसह मेसेजिंग टूल देखील मिळेल. गूगल पेच्या अ‍ॅप रीडिझाईन अ‍ॅपमध्ये युजर्स आपल्या सर्वाधिक ट्रांजक्शन करणार्‍या लोकांना ट्रॅक करू शकतील. तसेच, तुम्ही एखाद्या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास, त्यासोबत केलेल्या सर्व जुन्या ट्रांजक्शनचे डिटेल्स दिसतील. हे चॅट क्लिक बबलमध्ये दिसून येईल. या चॅट बॉक्समध्ये आपल्याला पेमेंटचा पर्याय मिळेल. ज्याठिकाणी तुम्हाला मनी रिक्वेस्ट, बिल पाहू शकता.
 

Web Title: google to soon launch rebranded version of phone by google give tough competition to truecaller 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.