शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

Ok Google, Hindi bolo; आता हिंदीत बोलणार Google Assistant 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:15 PM

Google Assistant Update : गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं.

ठळक मुद्देगुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात.भारतीय युजर्स Google Assistant वर 'Ok Google, Hindi bolo' बोलून हिंदीमध्ये सर्च करू शकतात. 'Talk to me in Hindi' बोलून हिंदीत संवाद साधू शकतात.

नवी दिल्ली - गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये Google Assistant हिंदी भाषेमध्ये बोलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुगलने हिंदीसोबत आणखी पाच भाषांचा देखील समावेश केला आहे. यामध्ये मराठी, बांग्ला, तेलुगू, उर्दू आणि तमिळ भाषेचा समावेश आहे. 

भारतीय युजर्स Google Assistant वर 'Ok Google, Hindi bolo' बोलून हिंदीमध्ये सर्च करू शकतात. तर 'Talk to me in Hindi' बोलून हिंदीत संवाद साधू शकतात. युजर्सना हिंदी न्यूज पाहायची असल्यास 'Ok Google, Hindi news' बोला म्हणजे समोर हिंदी भाषेतील बातमी ओपन होईल. यासोबतच गुगल व्हॉईस कमांड सर्व्हिसवर देखील काम करत आहे. म्हणजेच पिझ्झा ऑर्डर करायचा असल्यास केवळ व्हॉईस कमांडचा वापर केला जाणार आहे. 

Google Assistant भारतात साधारण दोन वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर या सर्व्हिसचा वापर हा जवळपास 30 भाषांमध्ये 80 देशांमध्ये केला जात आहे. गुगल असिस्टंटने भारतात आता आपली फोन लाईन सर्व्हिस देखील सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच युजर्स फोनच्या मदतीने गुगल असिस्टंटचा वापर करू शकतात. याचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी इंटरनेटची गरज नाही. युजर्स फक्त फोनवर Ok Google बोलून कोणताही प्रश्न विचारू शकतात.

Google Assistant ने भारतात आपली फोन लाईन असिस्टेंट सर्व्हिस टेलिकॉम कंपनी वोडाफोनसोबत मिळून हे लॉन्च केलं आहे. यासाठी कोणताही जास्तीचा चार्ज देण्याची गरज नाही. तसेच इंटरनेटची ही गरज नाही. या सर्व्हिसचा उपयोग करण्यासाठी  0008009191000 नंबर डायल करा. या नंबरवर फोन करून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर प्राप्त करू शकता. ही सर्व्हिस हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये काम करणार आहे. 

गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणारगुगलचं व्हॉईस बेस्ड व्हर्चुअल असिस्टंट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज वाचून दाखवणार आहे. रिपोर्टनुसार, गुगल असिस्टंटचं हे नवं फीचर व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, स्लॅकसारख्या अ‍ॅप्सवर येणारे मेसेज केवळ वाचून दाखवणार नाही तर त्यांना रिप्लाय देण्यासाठी देखील सक्षम असणार आहे. स्मार्टफोनमधील डिफॉल्ट मेसेज आणि गुगल हँगआऊटचे मेसेज सध्या यामाध्यमातून ऐकले जात आहेत. गुगल असिस्टंटच्या मदतीने मेसेज वाचण्यासाठी जेव्हा युजर्स कमांड देतील तेव्हा सर्वप्रथम नोटीफिकेशन अ‍ॅक्सेसची परवानगी घेतली जाईल. गुगल असिस्टंट फीचरमध्ये एकदा सर्व परमिशन्स अलाऊ केल्यानंतर तसेच फीचर अनेबल केल्यावर असिस्टंट युजर्सना लास्ट मेसेज वाचून दाखवेल. कोणत्याही मेसेजिंग अ‍ॅपवर आलेला मेसेज वाचून दाखवला जाणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान