google assistant may soon be able to read and reply to your whatsapp and other messaging app like | गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणार
गुगल असिस्टंट अधिक स्मार्ट होणार, Whatsapp मेसेज वाचून दाखवणार

ठळक मुद्देगुगलचं व्हॉईस बेस्ड व्हर्चुअल असिस्टंट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज वाचून दाखवणार आहे. गुगल असिस्टंटचं हे नवं फीचर व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, स्लॅकसारख्या अ‍ॅप्सवर येणारे मेसेज केवळ वाचून दाखवणार नाही तर त्यांना रिप्लाय देण्यासाठी देखील सक्षम असणार.युजर्स मेसेजचा रिप्लाय बोलून अथवा टाईप करून देऊ शकणार आहेत.

नवी दिल्ली - गुगल हे लोकप्रिय सर्च इंजिन असून त्याचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी केला जातो. गुगल असिस्टंट अपडेट होत असतं. यामध्ये अनेक नवनवीन फीचर येत असतात. गुगलचं व्हॉईस बेस्ड व्हर्चुअल असिस्टंट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसेज वाचून दाखवणार आहे. रिपोर्टनुसार, गुगल असिस्टंटचं हे नवं फीचर व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, स्लॅकसारख्या अ‍ॅप्सवर येणारे मेसेज केवळ वाचून दाखवणार नाही तर त्यांना रिप्लाय देण्यासाठी देखील सक्षम असणार आहे. 

स्मार्टफोनमधील डिफॉल्ट मेसेज आणि गुगल हँगआऊटचे मेसेज सध्या यामाध्यमातून ऐकले जात आहेत. गुगल असिस्टंटच्या मदतीने मेसेज वाचण्यासाठी जेव्हा युजर्स कमांड देतील तेव्हा सर्वप्रथम नोटीफिकेशन अ‍ॅक्सेसची परवानगी घेतली जाईल. गुगल असिस्टंट फीचरमध्ये एकदा सर्व परमिशन्स अलाऊ केल्यानंतर तसेच फीचर अनेबल केल्यावर असिस्टंट युजर्सना लास्ट मेसेज वाचून दाखवेल. कोणत्याही मेसेजिंग अ‍ॅपवर आलेला मेसेज वाचून दाखवला जाणार आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

एका मेसेजनंतर पुढील परवानगी मागण्यात येईल आणि युजर्सनी नेक्स्ट असं सांगितल्यावर पुढील मेसेज वाचून दाखवला जाणार आहे. तसेच युजर्स मेसेजचा रिप्लाय बोलून अथवा टाईप करून देऊ शकणार आहेत. ज्याप्रमाणे अ‍ॅन्ड्रॉईडवर गुगल असिस्टंट सपोर्ट करतो त्याचप्रमाणे अ‍ॅपलचं व्हर्चुअल असिस्टंट सीरी आहे. सीरीमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य मेसेजिंग अ‍ॅपवर आलेले मेसेज वाचून दाखवण्याचं फीचर 2018 पासून आहे. 

many sites track your online activities change these google privacy settings now | आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला

आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर; त्वरीत बदला 'या' सेटिंग्स 

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्याएका क्लिकवर अगदी सहज मिळते. इंटरनेट सर्च, कॅलेंडर, स्मार्ट असिस्टेंट, मॅप्स आणि लोकेशन डेटा पर्यंत युजर्सची सर्व माहिती ही गुगलकडे असते. गुगल प्रत्येक ठिकाणी युजर्सना ट्रॅक करत असतं. आवाजापासून लोकेशनपर्यंत युजर्सच्या सर्व गोष्टींवर गुगलची नजर असते. युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे महत्त्वाची खासगी माहिती सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच गुगल अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. 

facebook is working on a device which will let users type with mind | आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

आता तुम्ही बोटांनी नव्हे, डोक्याने टायपिंग करणार, फेसबुक नवं तंत्रज्ञान आणणार

फेसबुक हे लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता एक ब्रेन कम्प्यूटर ऑगमेंटेड रियलिटी (एआर) इंटरफेस डिव्हाईस विकसित करत आहे. या डिव्हाईसच्या मदतीने युजर्स बोटांनी नव्हे तर डोक्याने टायपिंग करू शकणार आहेत. फेसबुकने F8 डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2017 मध्ये ब्रेन कम्प्यूटर इंटरफेस (बीसीआय) प्रोग्रामची घोषणा केली होती. या प्रोग्रामच्या मदतीने एक छोटं डिव्हाईस तयार करण्यात येणार आहे. यामध्ये युजर्स विचार करून अगदी सहजपणे टाईप करू शकणार आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को (UCSF) येथील एका रिसर्च टीमची यासाठी फेसबुक मदत घेत आहे. बोलण्यासाठी असमर्थ असणाऱ्या लोकांना या डिव्हाईसचा अत्यंत फायदा होणार आहे. ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटी वाचून रियल टाईममध्ये ते स्पीचमध्ये बदलण्यात येणार आहे. फेसबुकने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये यूसीएसएफच्या टीमने याबाबत माहिती दिली आहे. 

 

English summary :
Upcoming Update of Google Assistant: Google Assistant comes with many new features. Google's Voice-based Virtual Assistant will soon read the incoming messages on WhatsApp. Reportedly, this new feature of Google Assistant will not only read the incoming messages on apps like WhatsApp, Telegram, Slack, but also be able to respond to the messages.


Web Title: google assistant may soon be able to read and reply to your whatsapp and other messaging app like
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.