शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

7 कोटी एअरसेल युजर्सचे नंबर होणार बंद; 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 11:09 IST

जर आपण एअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देएअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार31 ऑक्टोबर ही शेवटची डेडलाइन दिली असून, त्यानंतर ज्यांनी नंबर पोर्ट केलेले नाहीत, त्यांचे नंबर बंद होणार आहेत. 28 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2019दरम्यान 19 मिलियन (1.9 कोटी) एअरसेल युजर्सनं स्वतःचे नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केलेले आहेत.

नवी दिल्लीः जर आपण एअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार आहेत. कारण 31 ऑक्टोबर ही शेवटची डेडलाइन दिली असून, त्यानंतर ज्यांनी नंबर पोर्ट केलेले नाहीत, त्यांचे नंबर बंद होणार आहेत. TRAI दिलेल्या निर्देशानुसार, जवळपास 70 मिलियन(7 कोटी) युजर्स एअरसेल नेटवर्कचा वापर करतात. आतापर्यंत 1.9 कोटी एअरसेल युजर्सनं केले नंबर पोर्टखरं तर 2018मध्ये एअरसेलनं आपल्या काही सेवा खंडित केलेल्या आहेत. त्यावेळी कंपनीजवळ 90 मिलियन(9 कोटी) युजर्स होते. TRAIच्या डेटानुसार, 28 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2019दरम्यान 19 मिलियन (1.9 कोटी) एअरसेल युजर्सनं स्वतःचे नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केलेले आहेत. पण अजूनही 7 कोटी युजर्स एअरसेल नेटवर्कचा वापर करत आहेत. वर्ष 2018मध्ये जेव्हा एअरसेलनं काही सेवा खंडित केल्या होत्या, त्यावेळी कंपनी आरकॉमशी मर्जर होणार असल्याची चर्चा होती. परंतु TRAIने त्याला मंजुरी न दिल्यानं त्या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या नाहीत. ज्यावेळी एअरसेलनं सेवा खंडित केली, त्यावेळी त्यांच्याकडे बीएसएनएलपेक्षा जास्त युजर्स होते. सोपं आहे नंबर पोर्टेबिलिटीजर आपल्याला नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करायचा असल्यास फारच सोपी पद्धत आहे. त्यासाठी पहिल्यांदा कुठल्या नेटवर्कची सेवा वापरायची आहे हे निश्चित करावं लागणार आहे. त्यानंतर मेसेजमध्ये जाऊन PORT आणि त्यासोबत करायचा असलेला एअरसेलचा मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे, तोच मेसेज 1900वर पाठवावा. मेसेज 1900वर केल्यानंतर आपल्याला एक युनिक पोर्टिंग कोड मिळणार आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही नेटवर्कची सेवा घेऊ शकता. तसेच आपल्याला ऑफलाइन स्टोअरमध्ये जाऊनही नंबर पोर्ट करता येऊ शकतो.