शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

108 मेगापिक्सलचा कॅमेरा कमी पडला, रिअलमीने 200MP वाला स्मार्टफोन लाँच केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 14:33 IST

रिअलमीची १० सिरीज घेणारे १०८ मेगापिक्सलच्या कॅमेराची क्वालिटी पाहून पस्तावले आहेत. असे असताना आता ते २०० मेगापिक्सलचा कॅमेरासाठी जातील का, असा प्रश्न आहेच.

अनेकांना त्यांच्याकडील स्मार्टफोन चांगला, बहुउद्देशीय म्हणजेच ऑलराऊंडर हवा असतो. म्हणून कंपन्या दर महिन्या, दोन महिन्यांनी, सहा महिन्यांनी नवीन स्मार्टफोन लाँच करत असतात. आपल्या अपेक्षांना ते फोन खरे ठरले नाहीत की आपण तो विकून दुसरा घ्यायला धावतो. या कंपन्या त्याचाच फायदा उचलतात. आता रिअलमीचेच पहा, कंपनीने काही महिन्यांपूर्वी रिअलमी १० आणि १० प्रो असे १०८ मेगापिक्सल कॅमेरे असलेला फोन लाँच केला होता. तो कमी पडला म्हणून की काय आता 200MP ची लेन्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. 

रिअलमीची १० सिरीज घेणारे १०८ मेगापिक्सलच्या कॅमेराची क्वालिटी पाहून पस्तावले आहेत. असे असताना आता ते २०० मेगापिक्सलचा कॅमेरासाठी जातील का, असा प्रश्न आहेच. कारण रिअलमीने Realme 11 Pro 5G मध्ये 108MP चा कॅमेरा दिला आहे. तर प्रो प्लस व्हेरिअंटमध्ये 200MP चा कॅमेरा दिला आहे. 

रिअलमी हा चिनी स्मार्टफोन ब्रँड आहे. ११ प्रोमध्ये लेदर फिनिशचे बॅक पॅनल मिळते. 8GB RAM + 128GB ते 256GB स्टोरेजचे व्हेरिअंट लाँच केले आहेत. या फोनची 8GB RAM व 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. हा फोन १६ जूनला उपलब्ध होणार आहे. 12GB RAM + 256GB  व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे. याची विक्री १५ जूनपासून सुरु होणार आहे. तर आजपासून तुम्ही हा फोन अर्ली अॅक्सेसद्वारे विकत घेऊ शकता.

Realme 11 Pro+ 5G मध्ये 6.7-inch चा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आहे. MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्य़ात आला आहे. फोनमध्‍ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. मेन लेंस 200MP आहे. शिवाय 8MP का अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP का मॅक्रो लेंस देण्यात आलेली आहे. 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ५००० एमएएचच्या बॅटरीला 100W ची फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. 

टॅग्स :realmeरियलमी