शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कमजोर हूं मगर मजबूर नहीं.. जीता हूं शान से..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 11:48 AM

सोलापुरातील दिव्यांग दस्तगीर शेख यांची प्रेरणादायी कहाणी : दिव्यांग असूनही फॅब्रिकेशनचे करतात काम

ठळक मुद्देदस्तगीर सत्तार शेख असे या जिद्दी चाचाचे नाव आहे, ते नई जिंदगी येथील शोभादेवी नगरात राहतातकाही वर्षांपूर्वी चाचांच्या धर्मपत्नीचा मृत्यू झाला़ त्यानंतर त्यांनी एका अंध महिलेशी दुसरा विवाह केलादस्तगीर चाचा जन्मत: उजव्या हाताने दिव्यांग आहेत, तसेच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला

सोलापूर : स्टील फर्निचर अर्थात फॅब्रिकेशनचे काम अवघड असते़ या लोखंडी फॅब्रिकेशनच्या कामाला सुदृढ माणसाचेही बळ कमी पडते़ अशा अवजड कामावर नई जिंदगी येथील दस्तगीर चाचांनी मात केली़ अत्यंत सुबक आणि आकर्षक स्टील फर्निचर तयार करण्याचे काम ते अत्यंत जिद्दीने करताहेत. चाचा आज पन्नाशीत पोहोचलेत. प्रचंड आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी यातून चाचा स्वावलंबी झालेत़ नुसते स्वावलंबी न होता त्यांनी फॅब्रिकेशनचा मोठा व्यवसाय देखील थाटला आहे.

दस्तगीर सत्तार शेख असे या जिद्दी चाचाचे नाव आहे़ ते नई जिंदगी येथील शोभादेवी नगरात राहतात़ येथेच त्यांचा साईबाबा स्टील फर्निचर फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू आहे़ या कामात त्यांचा मुलगाही सक्रिय आहे़ काही वर्षांपूर्वी चाचांच्या धर्मपत्नीचा मृत्यू झाला़ त्यानंतर त्यांनी एका अंध महिलेशी दुसरा विवाह केला आहे़ त्यांना दोन मुले आहेत़ त्यांच्या या उदार दृष्टिकोनाचेही समाजातून कौतुक झाले.

दस्तगीर चाचा जन्मत: उजव्या हाताने दिव्यांग आहेत़ तसेच वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला़ यात त्यांचा उजवा पाय पूर्ण निकामी झाला़ उजव्या हाताने आणि पायाने दिव्यांग झाल्यानंतरही चाचांनी जिद्द सोडली नाही़ घरची परिस्थिती बेताचीच होती़ त्यामुळे त्यांना शिकता आले नाही़ याउलट त्यांची बुद्धी आणि कल्पकता यातून ते स्टील फर्निचर व्यवसायात कुशल कारागिर बनले़ या व्यवसायात ते कसे आले या विषयी सांगताना चाचा बोलतात, लहानपणापासून मी आम्रपाली हॉटेल येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात कामाला जात होतो़ या ठिकाणी मला फर्निचरचे काम शिकायला मिळाल़े.

 वयाच्या वीस वर्षांनंतर मी स्वतंत्र व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला़ खूप आर्थिक अडचणी आल्या़ पूर्वी छोटे काम करायचो़ लोक टिंगलटवाळी, चेष्टा करायचे़ दु:ख वाटायचे़़ परंतु हिंमत हारू नये, हे माझ्या आई-वडिलांनी शिकवलेले होते़ त्यामुळे मी कष्ट करत राहिलो़ आज सोलापुरातील बडे उद्योजक माझ्याकडून स्टील फर्निचरची कामे करून घेतात़ या व्यवसायातून मी रोज हजार ते पंधराशे रुपये कमावतोय़ 

अष्टपैलू चाचा...- लोखंडी कपाट, खुर्च्या, टेबल, दरवाजे, गेट, जीना, मंगल भांडार साहित्य, बफे स्टँड, पत्राशेड मारणे, बिल्डिंगची कामे, चपाती शेंगड्या, इलेक्ट्रॉनिक शेंगड्या यासह स्टील फर्निचरची अनेक कामे चाचा करतात़ त्यांचे काम लोकांच्या पसंतीस उतरत असल्याने त्यांच्या कामांना मोठी मागणी येत आहे़ त्यांच्या व्यवसायाकरिता त्यांनी सोलापूर महानगरपालिकेला अल्पदरात शासकीय जागेची मागणी केली होती़ तसे निवेदन पालिकेच्या अनेक आयुक्तांना दिले़ जिल्हाधिकाºयांना दिले़ लोकप्रतिनिधींनाही दिलेत़ याचा काहीच उपयोग झाला नाही़ माझी जागा खरेदीची क्षमता नाही़ त्यामुळे मला शासनाकडून जागा मिळावी, अशी मागणी चाचांची आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूर