सोलापूर लोकसभा आपण लढवू : लक्ष्मणराव ढोबळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:03 PM2020-02-24T13:03:50+5:302020-02-24T13:05:27+5:30

खासदार जयसिध्देश्वर महास्वामींचा दाखला रद्द झाल्याची चर्चा

We will contest the Solapur Lok Sabha: Laxmanrao Dhole | सोलापूर लोकसभा आपण लढवू : लक्ष्मणराव ढोबळे 

सोलापूर लोकसभा आपण लढवू : लक्ष्मणराव ढोबळे 

Next
ठळक मुद्दे- माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे पंढरपूर दौºयावर- खासदार जयसिध्देश्वर महास्वामींचा दाखला रद्द झाल्याची चर्चा- जातपडताळणी समितीने दिला निर्णय

पंढरपूर : सोलापूर भाजपाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्यास आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.

पंढरपूर येथे संतांचा मेळावा होणार आहे. कार्यक्रमाची माहिती सांगण्यासाठी माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पंढरपुरातील विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.

ढोबळे म्हणाले, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याबाबतची चर्चा कानावर येत आहे, परंतु खासदार स्वामी हे उच्च न्यायालयात जाणार आहेत. या प्रकरणात अपिलावर अपील होणार आहे. यामुळे हे प्रकरण शिथील होणार आहे. आणि जर निवडणूक लागण्याची वेळ आलीच अन् पक्षाने आदेश दिले तर आपण सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.


 

Web Title: We will contest the Solapur Lok Sabha: Laxmanrao Dhole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.