शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विजयसिंहांना आली उभारी !

By admin | Updated: May 17, 2014 01:09 IST

शरद पवारांची प्रतिष्ठा जपण्यात मिळाले यश पक्षांतर्गत नाराजी दूर केल्याचा झाला फायदा सदाभाऊ खोत यांनी दिली अटीतटीची लढत प्रतापसिंहांच्या उमेदवारीचा परिणाम नाही

 

सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी थोडक्या मतांनी का होईना मिळविलेला विजय हा त्यांच्या ‘बॅकफूट’वरून राजकारणात स्थिरावणारा ठरला आहे. यामुळे मोहिते-पाटील घराण्याला चांगले बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा या मतदारसंघातील वारसदार म्हणून विजयसिंह पुढे आले आहेत. खरंतर सुरुवातीपासूनच या मतदारसंघात राष्टÑवादीमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता, पण शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पवारांचे या मतदारसंघातील वारसदार म्हणून राष्टÑवादीचे नेते कामाला लागले. आणि समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आव्हान दिलेले असतानाही विजयसिंहांनी थोड्या फरकाने विजय मिळवून हा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात जवळून अभ्यास, जिल्ह्यातील सहकारी संस्था उभारणीत दिलेले मोठे योगदान, शांत व संयमी स्वभाव या गोष्टी विजयसिंह यांना विजय मिळविण्यात फायद्याच्या ठरल्या आहेत. शरद पवारांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील राष्टÑवादीचे आमदार आणि नेत्यांनी विजयसिंहांचा जोमाने प्रचार केला. शिवाय शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांना दिलेले बळ, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दिलेली चांगली साथ, प्रचारात एकसूत्रीपणा आणि सक्रियता या गोष्टी त्यांच्या विजयात सरस ठरल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी महायुतीतर्फे निवडणूक लढवून विजयसिंहांची चांगलीच दमछाक केली होती. ऊसदर आंदोलनामुळे अख्ख्या मतदारसंघात परिचय असूनही अपेक्षेप्रमाणे याचा त्यांना फायदा झाला नाही. मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचा मोठा फटका येथे सदाभाऊंना बसला. महायुतीत असताना या मतदारसंघातील मित्रपक्षांनी प्रचारात म्हणावी तशी सक्रियता दाखविली नसल्याचा फटका त्यांना बसला. या मतदारसंघातील शेतकर्‍यांचा पाणीप्रश्न सदाभाऊंना आक्रमकपणे मांडता आला नाही.

-------------------

या कारणांमुळे मिळाला विजय विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व राष्टÑवादीच्या नेत्यांनी जातीने लक्ष घातले होते. शरद पवारांचे या मतदारसंघात वारसदार म्हणून विजयसिंहांकडे पाहिले गेले. सातारा जिल्ह्यातील माण, फलटण, खटावमधील काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीला नाराजी दर्शविली खरी, पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: लक्ष घालून काँग्रेस नेत्यांमधील नाराजी दूर करण्यात यश मिळविले. सुरुवातीला नेत्यांमध्ये उमटलेली नाराजी दूर करण्यात यश मिळविता आले. यासाठी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जातीने या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचाराच्या प्रवाहात आणले.

-------------

जिंकल्याचे कारण राष्टÑवादीच्या नेत्यांची प्रचारात सक्रियता मतदारसंघात पवारांनी जातीने घातलेले लक्ष काँग्रेस, शेकापची मिळालेली चांगली साथ प्रचारात सक्रियता

---------------------

हरल्याचे कारण मतदारसंघाबाहेरील उमेदवार केवळ शेतकर्‍यांचेच कैवारी असल्याचा ठपका महायुतीतील मित्रपक्षांची म्हणावी तशी साथ नव्हती