शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Video : धरिला पंढरीचा चोर... विठ्ठलमूर्तीजवळील पूजार्‍यानेच चोरले देणगीचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 20:02 IST

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद; मंदिर समितीने केला गुन्हा दाखल

सोलापूर/पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या मूर्ती जवळील देणगी पेटीतून दिवसा ढवळ्या हातसफाईने पैसे चोरणाऱ्या पुजाऱ्याविरुद्ध मंदिर समितीने गुन्हा दाखल केला आहे. चोरी करणाऱ्या पूजार्‍याचे नाव अमोल ज्ञानेश्वर चिटणीस ( रा. इसबावी पंढरपूर) असे आहे. १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास एका भाविकाने श्री विठ्ठलाच्या मूर्ती जवळील देणगी पेठेमध्ये दोन हजार रुपयांची नोट टाकताना पोलीस हेडकॉन्स्टेबल वामनराव यलमार यांनी पाहिले होते.

१४ ऑक्टोंबर रोजी वामनराव यलमार यांनी लेखापाल विभागाचे लिपिक संभाजी मोहन देवकर यांना १२ ऑक्टोबर रोजी विठ्ठलाच्या चरणात समोरील देणगी पेटीतून २ हजार रुपयांची नोट दान म्हणून आली आहे का ? असे विचारले होते. संभाजी देवकर यांनी रजिस्टर तपासून २ हजार रुपयांची नोट देणगी पेटीतून जमा न झाल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वामनराव यलमार त्यांना संशय आल्याने त्यांनी मंदिर समितीचे कर्मचारी सावता हजारे यांच्यासह सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले.

त्या चित्रीकरनामध्ये १२ ऑक्‍टोबर रोजी एका भाविकाने श्री विठ्ठलाच्या चरणाजवळ दानपेटी मध्ये २ हजार रुपयाची नोट टाकलेली मंदिर समितीतील नित्‍योपचार विभागातील सेवक अमोल ज्ञानेश्वर चिटणीस ( रा. इसबावी पंढरपूर) आणि हात सफाईने चोरली असल्याचे दिसून आले. यामुळे मंदिर समितीच्या वतीने संजय नारायण कोकीळ (रा. भक्तीमार्ग, पंढरपूर) यांनी  अमोल चिटणीस यांच्याविरुद्ध मंगळवारी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

शिताफीने देणगी पेटीतील पैशांची चोरी

भाविकांनी देणगी म्हणून दिलेली दोन हजार रुपयाची नोट देणगी पेटीमध्ये टाकताना ती पूर्णपणे न पडेल अशा पद्धतीनेच ठेवत होता. नंतर हार घेताना ती नोट मोठ्या शिताफीने काढून घेत होता. परंतु हा सर्व प्रकार सीसीटीव्हीचे उतरण पाहिल्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल वामनराव यलमार यांच्या निदर्शनास आला.

 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी