शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सोलापूरची वरदायिनी; पुण्यातील धरणांमुळे ४० वर्षांत ३४ वेळा भरले उजनी धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 2:45 PM

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी 

ठळक मुद्देउजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहेउजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोºयात आॅगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ४० वर्षांत ३४ व्या वेळेस तुडुंब भरले. गेल्यावर्षी आॅगस्टच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.

सोलापूरसहपुणे, अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी प्रचंड आहे. धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले तेव्हा १२३ टीएमसी साठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे. तसेच राज्यातील तिसºया क्रमांकाचा उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. 

उजनी धरणाचा एकूण जलसाठा ११०.८९  एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढा आहे. उजनी धरणाचा उपयोग फक्त सिंचनासाठीच नाही तर या धरणातील पाण्याचा उपयोग विद्युत निर्मिती, पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, मत्स्यव्यवसाय तसेच पूर नियंत्रणासाठी केला जातो. म्हणूनच धरण बहुउद्देशीय आहे. उजनी धरणाच्या पाण्यापासून पावसाळ्यात दररोज १२ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते तर धरणाच्या ११२ किमी लांबीच्या डाव्या व १२६ किमी लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. वाढलेल्या ऊस उत्पादनामुळे जिल्ह्यात तब्बल ४० साखर कारखाने उभारण्यात आले. त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तुडुंब भरलेल्या या धरणाच्या पाण्याचा वापर नियोजनबद्ध व्हायला हवा अशी मागणीही होऊ लागली आहे. 

पुण्याच्या पश्चिम भागामुळे धरण भरते तुडुंब7377 चौरस मैल उजनी धरणात एवढे प्रचंड पाणलोट क्षेत्र लाभले असून सोलापूर जिल्ह्यात थोडाही पाऊस पडला नाही तरी पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे हे धरण अनेक वेळा तुडुंब भरलेले आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून नेहमीच उजनीचा उल्लेख केला जातो. 

बाष्पीभवनाच्या नावाखाली पळवले जाते १८ टीएमसी पाणी पूर्वी बारमाही असलेले उजनी धरण सध्या ८ माही करण्यात आले आहे.४० वर्षांत ३४ वेळा उजनी धरण शंभर टक्के भरले असले तरी नियोजनाअभावी ते तेवढ्याच वेळा रिकामेही झाले आहे. ढिसाळ नियोजनामुळे शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या असून आंदोलनही करावे लागले आहे. पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे गळतीच्या व बाष्पीभवनाच्या नावाखाली अनेकवेळा जलशयातील १६ ते १८ टीएमसी पाणी वेगवेगळ्या मार्गाने पळवले जाते ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPuneपुणेUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातRainपाऊस