शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीत कार घुसून दोन ठार

By admin | Updated: July 4, 2014 01:25 IST

आढीव विसावा येथील घटना

पंढरपूर : टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाल्याने कार विरूद्ध दिशेने फिरून अमरावतीच्या पायी दिंडीत घुसल्याने दोघे जागेवरच ठार झाले तर दहा जखमी झाले. यातील चौघे गंभीर आहेत. गुरूवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास आढीव विसाव्याजवळ पंढरपूर येथे ही घटना घडली. मृतांमध्ये एक महिला व एक पुरूष वारकऱ्याचा समावेश आहे. सोलापूरहून कुर्डूवाडीकडे निघालेल्या टेम्पो (क्र. एम. एच. १३/ ए. एन. ३६८) व कार (क्र. एम. एच. २५/आर. १५४२) ची समोरासमोर धडक झाली.दरम्यान, पायी चालत येणाऱ्या अमरावतीच्या दिंडीमध्ये कार घुसल्याने उमेश मारूतराव बावनखडे (वय २६) व इंदूबाई धोत्रे (वय ५0) हे दोघे जागीच ठार झाले तर अन्य दहा जखमी झाले आहेत. घटना घडताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन मदत केली व जखमींना उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये श्रीराम नारायण दुर्गे (वय २४, खारतडेगाव), पद्माकर विनोदराव दसरे (वय २७, सालोरा), कमल बबनराव वायस्का (वय ४५, रघुनाथपूर), कांता किरण मुळे (वय ३५, भांबुरा), शोभा गोकुळ चव्हाण (वय ४0, पाचोड, वर्धा), पुष्पा कुंडलिकराव पाटील (मालदडा), सरूबाई सुरेशचंद्र राठोड (वय ५0, अमरावती), ललिता प्रल्हाद पोहेकर (वय ५६, जामडी, अकोला), आशा रमेशराव आखरे (मारडा, अमरावती) यांचा समावेश आहे. हे सर्वजण रूक्मिणी माता संस्था, चौंडल्यपूर (ता. तिसवा, जि. अमरावती) या दिंडीतून पंढरपूरकडे येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला तर दहा जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झाला नव्हता.