शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात बुडून तीन शाळकरी मुलींचा मृत्यू

By admin | Updated: July 5, 2014 00:03 IST

कुडल येथील घटना

अक्कलकोट : पूजेसाठी नदीचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या गुब्याड (ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक) येथील सहा शाळकरी मुली व एक मुलगा कुडल (ता़ अक्कलकोट) येथील भीमा नदीपात्रात बुडाले. यापैकी तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला़ तीन मुलींसह एक मुलगा मात्र बचावला़ ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली़ या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अक्कलकोट तहसीलदारांची गाडी संतप्त नागरिकांनी जाळली़पाऊस पडावा म्हणून शुक्रवार असल्याने गुब्याड येथील या सर्व मुली पहाटे स्नान केल्यानंतर पालकांनी सांगितल्याने पाणी आणण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या. गावच्या परिसरात दोन किमी अंतरात पाणी मिळाले नसल्याने या मुली कुडल येथील भीमा नदी पात्रात गेल्या़ या पात्रात वाळू ठेकेदाराने वाळूचा उपसा केल्याने डबक्यात पाणी साचले होते़ डबक्यात पाण्यासाठी गेले असता भाग्यश्री सुतार, भाग्यश्री अतनुरे, महानंदा अतनुरे या तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ मल्लप्पा अतनुरे, द्राक्षणी मरगूर, कावेरी मरगूर, सुवर्णा गुब्याड हे सर्व बचावले़ जे बचावले आहेत त्यांच्यावर इंडी येथील तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ वरील सर्व सात जण गुब्याड (ता़ इंडी) येथे इयत्ता सातवीत शिकत होते़ घटनेची माहिती मिळताच गुब्याड येथील ४०० पेक्षा अधिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले़ परिस्थिती संवेदनशील बनली होती़ नातेवाईकांनी एकच आक्रोश केला़ दरम्यान अक्कलकोटचे तहसीलदार गुरु बिराजदार, निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र शेळके व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी संतप्त झालेल्या जमावाने वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी व तहसीलदारांची शासकीय गाडी जाळली़ दुपारी १२ वाजता मृतांचे शवविच्छेदन केल्यानंतर गुब्याड येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले़ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा दुबुले यांच्यासह ५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.----------------------------------------------देवपूजेसाठी गेल्या मुलीआषाढ महिना सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मंगळवारी, शुक्रवारी देवाला दही, भात, कडूलिंबाची पाने व पाणी वाहण्याची प्रथा आहे़ असे केल्यास सर्वत्र पाऊस पडेल, असा नागरिकांना विश्वास वाटतो़ देवाला पाणी वाहण्याचे काम लहान मुलांकडून केले जाते़ त्यानुसार या मुली पाणी आणण्यासाठी नदीपात्रात गेल्या होत्या. -------------------------------शासकीय मदत मिळवून देण्याविषयी चर्चा सुरू होती, मात्र गुब्याड ग्रामस्थांनी निवासी तहसीलदार सुरेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय आमची गाडी पेटविली. यामुळे ग्रामस्थांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.-गुरु बिराजदार, तहसीलदार, अक्कलकोट.घटनेची माहिती घेण्याचे काम चालू असताना काही समाजकंटकांनी मृतांच्या नातेवाईकांना भडकावून गोंधळ घातला. शासकीय वाहन पेटवून दिले. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.- राजेंद्र शेळके, पोलीस निरीक्षक, अक्कलकोट.