चोरट्यास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

By Admin | Updated: July 6, 2014 01:22 IST2014-07-06T01:22:36+5:302014-07-06T01:22:36+5:30

चोरट्यास पकडून मरिआई चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन

The thieves were captured and released to the police | चोरट्यास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

चोरट्यास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन


सोलापूर : चोरी करण्याच्या हेतूने वावरत असताना दमाणीनगर परिसरातील जागरुक नागरिकांनी त्याला पकडून फौजदार चावडी पोलिसांच्या स्वाधीन केले. संतोष बिभीषण जाधव (वय २३, रा. न्यू धोंडिबा वस्ती, रामवाडी, सोलापूर) असे पकडून दिलेल्या चोरट्याचे नाव आहे.
शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास संतोष हा दमाणीनगर परिसरात वावरत होता. चोरी कुठे करावी, कुठे हात मारावा याच विचारात तो संशयास्पद स्थितीत वावरत होता. याचवेळी एकाला त्याच्याविषयी शंका आली. त्याने ही गोष्ट एकाला सांगितली. तेवढ्यात मनोज सुरेराव, अशोक नवले, शेखर कवठेकर, वसीम शेख, लल्लू चेंडके, अनिल मगर, राम कारंडे, राजू नवले, शुभम झाडबुके, बाळू घुले आदी एकत्र आले आणि त्यांनी त्या चोरट्यास पकडून मरिआई चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन केले.
-----------------
तर चोऱ्या टळतील !
सध्या शहर आणि परिसरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांची रात्रीची गस्त असतानाही चोरट्यांनी डोके वर काढले आहे. ज्या-त्या भागातील नागरिकांनी थोडी झोप टाळून आणि टप्प्याटप्प्याने स्वत: गस्त घातली तर चोऱ्यांचे प्रकार टळतील, हे दमाणी नगरातील जागरुक नागरिकांनी दाखवून दिले.

Web Title: The thieves were captured and released to the police