शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनात पाणीप्रश्न पेटणार !

By admin | Updated: June 2, 2014 00:35 IST

सांगोल्याच्या शेतीचा प्रश्न; उपोषणासाठी दोन आमदार मुंबईला रवाना

सांगोला : सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न घेऊन आ. गणपतराव देशमुख व आ. दीपक साळुंखे दोन्ही लोकप्रतिनिधी विधानभवनासमोर ३ जूनपासून बेमुदत उपोषणास बसण्याच्या तयारीने रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामुळे आता पावसाळी अधिवेशनात सांगोल्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु आजपावतो तालुक्यास टेंभू व म्हैसाळचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, टेंभूचे पाणी बुद्धेहाळ तलावात व म्हैसाळचे पाणी पारे तालुक्यात आणण्यासाठी अंतिम टप्प्यातील जनचळवळीची भूमिका निश्चित करण्यासाठी शनिवार दि. १० मे रोजी आ.गणपतराव देशमुख व आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पाणी प्रश्नावरची भूमिका मांडली होती. पत्रकार परिषदेत आ.देशमुख व आ.साळुंखे पाटील यांनी टेंभू व म्हैसाळच्या पाण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा व आंदोलन करुनही शासन तालुक्यास पाणी देण्यास अपयशी ठरले आहे. दरम्यान, गेल्या २१ दिवसानंतरही शासनाने टेंभू-म्हैसाळच्या पाण्यावर कसलाच निर्णय घेतला नाही. याच्या विरोधात आज रविवार आ.गणपतराव देशमुख, आ.दीपक साळुंखे पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

----------------------------

- निर्णय नसल्याने संताप

शासनाने ३१ मे २०१४ पूर्वी दोन्ही योजनेचे पाणी तालुक्यास न सोडल्यास मंगळवार दि. ३ जून २०१४ पासून पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानभवनासमोर टेंभू-म्हैसाळ योजनेचा पाणी प्रश्न निकालात काढावा या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.

-----------------------------

शासनाचे लक्ष वेधणार

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार २ जूनपासून सुरू होत आहे. शासनाचे लक्ष वेधून सांगोल्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.