रवी पाटील यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा

By Admin | Updated: June 21, 2014 01:13 IST2014-06-21T01:13:37+5:302014-06-21T01:13:37+5:30

हॉटेलमधील साहित्य चोरल्याची फिर्याद

Theft against Ravi Patil | रवी पाटील यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा

रवी पाटील यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा


सोलापूर: रेल्वे लाईन्स परिसरातील हॉटेलमधील साहित्य चोरून नेल्याप्रकरणी इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदय शंकर पाटील यांचे मुनीम रमेश कलशेट्टी (वय ४२, रा. कुचननगर, अशोक चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील, गुरू कावडे, मल्लिनाथ हब्बू, राजू पसारे (सर्व रा. सोलापूर) या चौघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भादंवि ४५४, ५४७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी १७ जून रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहा या वेळेत रेल्वे लाईन्स परिसरातील प्रिन्स हॉटेलमध्ये आले व त्यांनी हॉटेलमधील सोफासेट, २० लाकडी टेबल, दोन सनलाईट काऊंटर, काचेचे ग्लास, स्टील ताट-वाटी, अ‍ॅल्युमिनियमची शेगडी, ११ हजारांची रोकड असा सुमारे ३४ हजार ८५० रुपयांचे साहित्य चोरून नेले. कलशेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खातरजमा करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कोणास अटक झालेली नाही. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Theft against Ravi Patil