शिक्षकांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: July 7, 2014 00:50 IST2014-07-07T00:50:56+5:302014-07-07T00:50:56+5:30

शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे

Teachers take up the movement | शिक्षकांचे धरणे आंदोलन

शिक्षकांचे धरणे आंदोलन


सोलापूर : वीस विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करु नयेत, संगणक परीक्षेस मुदतवाढ मिळावी, शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा व्हावी आदी विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले़
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी राज्यभर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ सोलापुरात समितीचे जिल्हाध्यक्ष राजन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते़ शिक्षण हक्क कायद्यातील जाचक अटी दूर करा, सर्व शाळांमध्ये ई- लर्निंगची सुविधा निर्माण करा, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या, कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा द्या आदी प्रमुख मागण्या आहेत़ या आंदोलनात सुरेश पवार, राजकुमार राऊत, बाबासाहेब माने, भिवा कांबळे, विलास शिराळ, राजाभाऊ राऊत, बाबा माने, श्रीकृष्ण कुंभार, सिध्दाराम डोळ्ळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़

Web Title: Teachers take up the movement