शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर महाराजांचा जातीचा दाखला हरविला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:40 IST

वळसंग पोलीस ठाण्यात दिली तक्रार; खासदारकी वाचविण्यासाठी महाराजांची धडपड सुरू

ठळक मुद्दे- खासदार जयसिध्देश्वर महास्वामी याची खासदारकी धोक्यात- खासदारकी टिकविण्यासाठी जयसिध्देश्वर महास्वामीची धडपड- मुंबई उच्च न्यायालयात जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालाविरूध्द केले अपील

सोलापूर : सोलापूर भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांचे बेडा जंगम जात प्रमाणपत्र हरवल्याचे आता समोर आले आहे़ याबाबत वळसंग पोलिस ठाण्यात १४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांचे वकील संतोष नावकर यांनी सांगितले़ त्यांचे शिष्य हे प्रमाणपत्र घेऊन सोलापूरकडे येत असताना कुंभारीजवळ हा दाखला हरवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्राविरुद्ध जिल्हा जात पडताळणी समितीसमोर दाखल झालेल्या तक्रारीच्या सुनावणीवेळी तक्रारदाराने मूळ जात प्रमाणपत्र समितीसमोर हजर करावे अशी मागणी केली होती, त्यावेळी अ‍ॅडवोकेट संतोष नावकर यांनी तक्रारीबाबत मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्याने अपिलासोबत मूळ दाखला जोडल्याचे सांगितले होते, त्यानंतर जात पडताळणी समितीसमोर अंतिम सुनावणी होईपर्यंत हा दाखला आणला गेलाच नव्हता़ जात पडताळणी समितीने बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र अवैद्य ठरवल्यानंतर आत्ता त्यांचे मूळ जात प्रमाणपत्र हरवल्याचे समोर येत आहे.

 जात पडताळणी समितीसमोर सुनावणी सुरू असतानाच उच्च न्यायालयातून हा दाखला काढून घेतला होता, त्यानंतर तो समितीसमोर दाखल करण्यात येण्यापूर्वीच हा दाखला हरवल्याचे न्हावकर यांनी म्हटले आहे़ जात पडताळणी समितीने दिलेल्या निकालाविरुद्ध खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी