टेल्कोतील पर्यवेक्षकासह सहा जणांवर गुन्हा

By Admin | Updated: July 11, 2014 01:50 IST2014-07-11T01:50:50+5:302014-07-11T01:50:50+5:30

फसवणुकीचा गुन्हा दाखल

Six people, including telco supervisor | टेल्कोतील पर्यवेक्षकासह सहा जणांवर गुन्हा

टेल्कोतील पर्यवेक्षकासह सहा जणांवर गुन्हा


सोलापूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतीची विक्री करून, फसवणूक केल्याप्रकरणी टेल्कोतील पर्यवेक्षक विठ्ठल गयाळे व त्यांची पत्नी ऊर्मिला (रा. धमई प्लाझा, कात्रज, पुणे) यांच्यासह सहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एस. डी. कंकणवाडी यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिले.
सिद्धेश्वर गयाळे (रा. कामती, ता. मोहोळ) यांनी अ‍ॅड. डी. एन. भडंगे, एन. एन. भडंगे यांच्यामार्फत विठ्ठल गयाळे, त्यांची पत्नी ऊर्मिला, विजय कुलकर्णी, मिनल कुलकर्णी (रा. माशाळवस्ती, सोलापूर), विलास गयाळे, अशोक गयाळे (रा. कामती) यांच्याविरूद्ध न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती. आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतीचा व्यवहार केला. ही बाब निदर्शनाला आल्यावर सिद्धेश्वर यांनी संबंधितांना नोटीस पाठविली. त्यावर आरोपींनी त्यांना किल्ला बगिचाजवळ १४ जून रोजी बैठकीला बोलावून, भरपाई देतो प्रकरण मिटवून घे म्हणून धमकावले. याबाबत पोलिसात तक्रार दिली तरी कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

Web Title: Six people, including telco supervisor