शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

धक्कादायक; पतीचा खून झाल्याची माहिती; तरीही पत्नीचा हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 12:22 PM

अंगद घुगे खून प्रकरण; मुलाच्या मित्रांना सुपारी देऊन पतीचा केला खून, ग्रामसेवक पत्नीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठळक मुद्देअंगद घुगे यांचा मुलगा विशाल घुगे याच्या अटकेनंतर खुनातील अनेक गोष्टी उघड झाल्याअंगद घुगे यांच्या पत्नी ग्रामसेवक जयश्री घुगे हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्नमुलाच्या मदतीने खून केल्याचे तिच्या सासू- सासºयाला व दिराला जाणवू दिले नाही

कुर्डूवाडी :  बार्शीचे कृषी सहायक अंगद घुगे यांच्या खुनात संशयित आरोपी म्हणून  मुलगा विशाल घुगे याच्यानंतर त्यांची पत्नी ग्रामसेविका जयश्री घुगे हिला बुधवारी सकाळी अटक केली. त्यानंतर तपासाअंती मुलाच्या मित्रांकरवी सुपारी देऊन खून केल्याचे उघड झाले. गुरुवारी दुपारी माढा न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. सय्यद यांच्या न्यायालयापुढे उभे केले असता तिला २८ जानेवारीपर्यंत   पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

पोलिसांच्या माहितीनुसार अंगद घुगे यांचा मुलगा विशाल घुगे याच्या अटकेनंतर खुनातील अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यात अंगद घुगे यांच्या पत्नी ग्रामसेवक जयश्री घुगे हिचाही समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर तिलाही बुधवारी अटक करण्यात आली. पोलीस तपासानंतर गुरुवारी तिला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

यावेळी प्रत्यक्ष खुनात विशाल घुगे याचे मित्र अतुल गांधले ( वय २४, रा लऊळ ,सध्या सरकारी गोडाऊनजवळ, बार्शी), प्रसाद गांधले ( वय २२,रा लऊळ,सध्या सरकारी गोडाऊनजवळ, बार्शी) व विकी शिंदे ( वय १९, रा. बार्शी) यांचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या मुलगा विशाल व पत्नी जयश्री वगळता तिन्हीही मित्र आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.  १४ जानेवारीपासून कृषी सहायक अंगद घुगे हे घरातून बेपत्ता होते तरीही त्यांच्या पत्नीने किंवा मुलाने कोणत्याही पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे त्या  दोघांवर पोलिसांचा संशय होता.

पोलीस तपासात मुलाकडून व पत्नीकडून काही गोष्टी उघड झाल्याने अंगद घुगे यांच्याशी पत्नी व मुलगा यांचे संबंध पराकोटीचे बिघडलेले असल्याचे निष्पन्न झाले. त्यातूनच मुलगा व पत्नी यांनी पूर्व नियोजन करून सदरचा खून मित्रांच्या साथीने केला असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण पाच आरोपी सामील असल्याचे सिद्ध झाले आहे. यातील तिघे आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. हरिश्चंद्र कांबळे तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विशाल सक्री यांनी काम पाहिले.

 खून झाल्याची माहिती... तरी हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभाग-  बेपत्ता झालेल्या अंगद घुगेचा मुलगा विशाल व त्याच्या मित्रांनी पूर्व नियोजनाप्रमाणे  १४ जानेवारीला खून केल्याची माहिती असतानाही १५ जानेवारीला पत्नी जयश्री घुगे यांनी मूळ भालगाव गावी महिलांबरोबर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात दिवसभर सहभाग घेतला होता. तिने नवºयाचा सुपारी देऊन मुलाच्या मदतीने खून केल्याचे तिच्या सासू- सासºयाला व दिराला जाणवू दिले नाही. पण तिच्या दिरांना तिचा संशय आला होता असे तिचे दीर व मृत अंगद घुगेचे भाऊ गुणवंत घुगे यांनी पोलीस जबाबात सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMurderखूनCrime Newsगुन्हेगारीmadha-acमाढा